मुंबई : Politics : महाराष्ट्रातील (maharashtra) सत्तासंघर्षाची (power-struggle) सुनावणी (Politics)अखरे तब्बल नऊ महिन्यानंतर झाली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील सुप्रीम कोर्टातील सुनावणी गेल्या काही नऊ महिन्यापासून कोर्टात सुरु होती. मागील नऊ दिवसांपासून लागोपाठ सुनावणी घेण्यात आली. आता सुप्रीम कोर्टाने हा निकाल राखून ठेवला आहे. (Politics)
निकाल राखून ठेवल्याने आता राज्यातील राजकारणात नेमकी काय उलथापालथ होणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. निकाल राखून ठेवल्याने उत्साकता लागून राहिली आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार? काय असेल निकाल ? याकडे सर्व देशाचं लक्ष लागले आहे. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी संस्कृत सुभाषिताने युक्तिवादाचा शेवट केला. कोकीळ आणि कावळा हे दोघेही एकाच रंगाचे.. कधी कधी कावळा पण कोकीळ असल्याचं नाटक करतो, पण जेव्हा पहाट होते तेव्हा पितळ उघडं पडतं…कोकीळ गाते आणि कावळा काव काव करतो, असे देवदत्त कामत यांनी युक्तीवादाच्या अखेरीस म्हटले..
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष…
– 14 फेब्रुवारी 2023 पासून 12 दिवस सुनावणी झाली.
– या काळात 48 तास कामकाज झाले.
– पहिले 3 दिवस प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे द्यायचे की नाही यावर युक्तिवाद झाला होता.
– त्यानंतर मागील 9 दिवसांपासून दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद झाला.
– 9 महिन्यानंतर सुनावणी सुरू झाली होती. आता साऱ्या देशाचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
– न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.