Politics मुंबई : महाराष्ट्राच्या राजकाराणात मोठी उलथा पालथ होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अजित पवर भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. तसेच राष्ट्रावादीच्या आमदारांनी काही वक्तव्ये केल्याने ते नक्कीच भाजपमध्ये जातील की काय असा प्रश्न राज्याला पडला आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना “अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला असता, त्यांनी यावर उत्तर दिले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा दावा केला आहे. येत्या पंधरा दिवसांत दोन राजकीय स्फोट होणार असल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या…!
एक स्फोट दिल्लीत होईल आणि दुसरा स्फोट महाराष्ट्रात होईल. विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा असताना सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केले आहे. याबाबत आज तकने वृत्त दिले आहे.
अजित पवार कुठे आहेत, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. यावर सुळे म्हणाल्या, माध्यमांनी अजित पवारांच्या मागे युनिट लावले आहे. राज्यात अनेक समस्या आहेत, राज्यात चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे.”
अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार का?, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “हे दादांना विचारा, मला गॉसिपसाठी वेळ नाही. लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे खूप काम आहेत. त्यामुळे मला त्याची माहिती नाही. पण कष्ट करणारा नेता म्हणून सर्वांनाच अजित पवार आवडतात, म्हणूनच अशी विधाने केली जातात
“छत्रपती संभाजी नगर येथील महाविकास आघाडीच्या सभेत जयंत पाटील यांचे भाषण झाले नाही. याचा अर्थ असा नाही की ते रागावले आहेत. महाविकास आघाडीच्या प्रत्येक सभेत दोनच लोक बोलायचे हे आधीच ठरले होते. तसेच अजित पवार नाराज असल्याच्या या सर्व अफवा आहेत. ज्या झाडांना जास्त फळे येतात, त्या झाडांवरच दगडफेक केली जाते, असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.