Politics पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तसेच अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षापदाचा राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या राजीनामा दिल्याने कार्यकर्ते भावूक झाल्याचे दिसून येत आहे. तसेच त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी उपोषणाला देखील बसले आहेत. असे असताना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. े
राजकाराणातून शरद पवारांनी संन्यास घेतला नाही. शरद पवारांसारखे नेते राजकारण, समाजकारणातून कधी निवृत्त होत नाही. असे राऊतांनी सांगितले.
राऊत म्हणाले…!
” शरद पवारांची देशाला आणि राज्याला गरज आहे. एखाद्या पदावरून निवृत्त होणं म्हणजे समाजकारण, राजकारणातून निवृत्त होत नाही.
त्यांचा निर्णय धक्कादायक असला तरी त्यात काही अनपेक्षित नाही.”
शरद पवारांनी हा निर्णय का घेतला हे शरद पवारच सांगू शकतील. 1990 च्या दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. मात्र लोकांचा आणि शिवसैनिकांचा रेटा इतका होता की त्यांना राजीनामा परत घ्यावा लागला. त्याचा मी साक्षीदार आहे. अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही…
आज त्यांचा पक्ष गोंधळेला आहे. त्यामुळे इतर पक्षांनी त्यामध्ये व्यत्यय आणणे योग्य नाही. महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही. कोणी त्याच्याशी संबंध जोडून नये.
राष्ट्रवादीचे नेतृत्व निर्वाद पवारच करणार आहेत. जिथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी पक्ष असेल. अंर्तगत पक्षाच्या घडामोडीवर किंवा त्यांच्या घडामोडींवर आम्ही चर्चा करणार नाही. त्यावर बोलणे योग्य नाही.
कार्यकर्त्यांच्या भावना मी पाहिल्या, नेता पदावरुन दूर होतो त्यावेळी कार्यकर्त्यांची भावना काय असते हे मी पाहिले आहे.
पवार साहेबांच्या डोक्यात काय चालते हे शेजारच्यालाही काही समजत नाही. याची माहिती सुप्रिया सुळे यांनाही नसेल. तसेच शरद पवारांच्य पत्नी यांना देखील माहिती नसावे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. ही शरद पवारांची खेळी नसावी, हा भावनिक निर्णय आहे. असे राऊतांनी यावेळी स्पष्ट केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!