(Politics News) पुणे : पुणेकरांना मिळकतकरात सवलत मिळावी अशी माागणी अनेक वर्षांपासूनची आहे. अखेर ती मागणी मान्य झाली आहे. शिदे-फडणवीस सरकारने मिळकरात सवलत देण्याची मागणी केवळ कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत शिंदे आणि फडणवीस यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळेच राज्य सरकारने सवलत देण्याचा निर्णय घेतला, असा टोला काँग्रेस पक्षाचे कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत लगावला.
…त्या लढ्याला यश आले…!
पुणेकर नागरिकांना मिळकतकरात सवलत मिळावी, यासाठी आम्ही सर्वजण लढा देत होतो, त्या लढ्याला यश आले. शहरातील मिळकतकरात ४० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे .
कसबा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत परावभव स्वीकारावा लागल्यानेच हा निर्णय झााल. त्यामुळी मी सर्व नागरिकांचे आभार मानतो. असेही त्यांनी येळी सांगितले.
सर्व मिळकतधारकांना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांच्याकडून महापालिका प्रशासन मिळकतकर वसुली करीत होती. त्यामुळे मिळकतकरात सवलत मिळाली पाहिजे अशी मागणी महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून आजवर मांडत आलो आणि आमदार म्हणून विधिमंडळात गेल्यावर तीच मागणी केली होती. त्या मागणीला काही प्रमाणात तरी यश आल्याच म्हणावं लागेल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Old Pension Scheme : सरकारी कर्मचारी आज संपावर ; कामकाजावर होणार परिणाम!
Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा यंग ग्लोबल लीडर्सच्या यादीत समावेश!