Politics News मुंबई : ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी रविवारी शिंदे गटात प्रवेश केला. (Politics News) यानंतर ठाकरे गटाकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. (Politics News) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मनिषा कायंदेंवर टीकास्र सोडलं. (Politics News) ४० कोटींच्या कथित फाईलमुळे कायंदे शिंदे गटात गेल्या, असं विधान संजय राऊतांनी केलं. (Politics News) यामुळे नव्याने चर्चा सुरू झाली आहे. (Politics News)
राऊतांच्या या विधानावर मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मला कुठल्या निधीचं आमिष दिलं नाही. मी कुठल्याही आमिषाला बळी पडले नाही, अशी प्रतिक्रिया कायंदे यांनी दिली. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
ठाकरे गटाच्या माजी प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी रविवारी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मनिषा कायंदेंवर टीकास्र सोडलं.
४० कोटींच्या कथित फाईलमुळे मनिषा कायंदे शिंदे गटात गेल्या, असं विधान संजय राऊतांनी केलं. राऊतांच्या या विधानावर स्वत: मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मला कुठल्या निधीचं आमिष दिलं नाही. मी कुठल्याही आमिषाला बळी पडले नाही, अशी प्रतिक्रिया मनिषा कायंदे यांनी दिली. शिंदे गटाच प्रवेश केल्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
४० कोटींची कुठलीतरी फाईल समोर आली म्हणून…
संजय राऊत म्हणाले, “जे खरे शिवसैनिक आहेत, ते शिवसेनेतच आहेत. प्रत्येक गोष्ट खोके किंवा पैशांनी विकत घेता येत नाही. ४० कोटींची कुठलीतरी फाईल समोर आली म्हणून बाई (मनिषा कायंदे) शिंदे गटात गेल्या, असं मी काल व्यासपीठावर ऐकलं आहे. याबद्दल मला जास्त माहीत नाही. मी या विषयावर फार बोलतही नाही. पण हे लोक कुठून येतात आणि कुठे जातात? हा एक संशोधनाचा विषय आहे. यावर भविष्यात आम्हाला विचार करावा लागेल.”