(Politics News) पुणे : राज्य शासनाने पुणे महापालिकेला( Politics News) वसुली थांबविण्याचे आदेश द्यावेत आणि पुणे शहरातील ५०० चौ. फुटाच्या आतील घरांना कर माफ करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
पुणेकर नागरिकांत तीव्र असंतोषाची भावना…!
मुंबई शहरात ५०० चौ. फुटांच्या आतील घर असणाऱ्या मिळकत धारकांचा कर माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु पुणेकरांना देण्यात आलेली सवलत रद्द करुन त्याची वसुली करण्यात येत असल्याने पुणेकर नागरिकांत तीव्र असंतोषाची भावना असल्याचेही धंगेकर यांनी म्हटले आहे.
आमदार रवींद्र धंगेकर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपला सहभाग नोंदवला. पुणेकर नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना कर माफीचा विषय लक्षवेधीच्या माध्यमातून रवींद्र धंगेकर यांनी सभागृहाच्या पटलावर आणला. ५०० चौरस फुटांचे घर असणाऱ्या मिळकत धारकांचा कर माफ करावा, ही मागणी राज्य सरकारने मान्य न केल्यास याविरोधात शहरात आंदोलन करु, असंही धंगेकरांनी सांगितलं.
पुणे महानगरपालिकेने घरमालकांना देण्यात येणारी मिळत करातील ४० टक्के सवलत रद्द केल्याने याचा फटका हजारो पुणेकरांना बसत आहे. राज्यात दिवसेंदिवस महागाई वाढत असून महागाईमुळे पुणेकरांवरीलही खर्चाचा बोजा वाढत आहे. त्यातच मिळकत करात देण्यात येणारी ४० टक्के सवलत बंद झाल्यामुळे पुणेकरांना मोठा आर्थिक फटका बसतोय.
दरम्यान, १९७० सालापासून सन २०१८ पर्यंत मिळालेला सवलत व्याजासहित पुणेकरांकडून वसुल करण्याचे आदेश देण्यात आल्याने यासंदर्भात पुणे म. न. पा ने वसुली व व्याज घेण्यावर स्थगिती द्यावी असा ठराव करून शासनाकडे पाठविला असतानाही याबाबत शुध्दीपत्रक शासनाने अद्यापही काढलेले नाहीत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Politics News : राजकारणाचं युद्ध संपलय आता समाजकारणाचं युद्ध ; रवींद्र धंगेकर
Maternity Leave : महिलेला प्रसूती रजेचा लाभ नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाने बीएसएला फटकारले!