व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Monday, May 26, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Politics News : हवेलीचे भुमी अभिलेख उपअधिक्षकास धमकावणे पडले महागात ; सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी थेऊरचे माजी सरपंच नवनाथ काकडे यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 18 March 2023, 15:46

(Politics News) लोणी काळभोर, (पुणे) : तुम्हाला जास्त माज आलेला दिसतोय, मी तुमचा माज लगेच उतरवु शकतो. अशी धमकी देत कर्तव्यावर असलेल्या हवेली भुमी अभिलेख उप अधिक्षकाच्या कामात हस्तक्षेप करून हुज्जत घातली.

सरकारी कामात अडथळा आणला व दमदाटी करत अरेरावी केल्याप्रकरणी थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नवनाथ काकडे याच्या विरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी हवेलीचे भुमी अभिलेख उपअधिक्षक शिवप्रसाद जिवनराव गौरकर (वय -४४, रा. वडगाव शेरी, पुणे) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपअधिक्षक शिवप्रसाद गौरकर हे हवेली भुमी अभिलेख उपअधिक्षक म्हणून कार्यरत आहेत. हवेली तालुक्यातील सर्व शहरी व निम शहरी भागातील कार्यालयामार्फत सर्व भुमी धारकांचे हद्दी कायम करून नकाशा देणे तसेच सिटी सर्वेचे कामकाज व नागरिकांना त्याच्या मागणीनुसार त्यांच्या मालकीचे जमीनीचे अभिलेख पुरवणे इ. कामे केली जातात.

याप्रकरणी थेऊर (ता. हवेली) येथील ओंकार चंद्रकांत कुंजीर यांनी मोजणी अर्ज केला होता. त्यानुसार ११ मार्च ला मोजणी नियोजित करण्यात आली होती. सदर प्रकरणात काकडे अर्जदार नसताना देखील काकडे यांनी भेटीसाठी वेळ देण्याची विनंती केली. भेटीदरम्यान काकडे यांनी सदर प्रकरणात मार्च महिन्यातच मोजणी करून दयावे असे सांगितले त्यावेळी उपअधिक्षक गौरकर यांनी काकडे यांना नियोजित वेळी मोजणी करुन देवू असे सांगितले होते.

सोशल मिडीयावर बदनामी करण्याची धमकी…!

गुरुवारी (ता. ०९) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास नवनाथ काकडे व त्यांचा आणखी एक साथीदार कार्यालयात येऊन थेऊर येथील हद्दीसंबंधी तातडीने बोलायचे आहे असे म्हणाले, त्यावेळेस उपअधिक्षक गौरकर म्हणाले सध्या लक्षवेधीचे कामकाज सुरु आहे. सध्या तुमच्याशी बोलु शकणार नाही, तुम्ही उद्या या आपण सविस्तर बोलू असे सांगतिले. याचा राग मनात धरून काकडे यांनी टेबलजवळ येवुन मोठयाने आरडा ओरड करत हुज्जत घालायला सुरुवात केली.

व म्हणाले कि तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे, तुम्हि कोणाशी बोलत आहात, मी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेया अध्यक्ष आहे. मी वारंवार भेट घेवुन देखील माझे काम तुम्ही करुन देत नाहीत तुम्हाला जास्त माज आलेला दिसतोय, मी तुमचा माज लगेच उतरवु शकतो. मी तुमची सोशल मिडीयावर बदनामी करेल, तुमच्या वरिष्ठांकडे तक्रार करेल. अशी धमकी दिली.

उपअधिक्षक गौरकर हे त्यांना मोजणीची प्रक्रिया प्रक्रिया समजावुन सांगत होते तसेच कार्यालाकडे आंबेगाव तालुक्यातील अधिकची ३२५ प्रकरणे मोजणी कामी फेब्रवारी व मार्च महिन्यात नियोजीत असल्याने त्याचे प्रकरण २१ मार्च नंतर करुन देण्याचा प्रयत्न करतो असे त्यांनी सांगितले. यावेळी “आम्ही काय उपटायला आलोय का. तुम्हाला सांगतोय लगेच करा तर तुम्ही नाही म्हणताय, याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, तुम्हाला भविष्यात याचा त्रास होईल, तुम्हाला बघुन घेतो” अशा धमक्या उपअधिक्षक गौरकर यांना दिल्या. यावेळी कार्यालयातील इतर भुकरमापक उपस्थित होते.

दरम्यान, काकडे याचा सदर प्रकरणाशी कसलाही संबंध नसताना हुज्जत घालुन शासकिय कामात अडथळा आणला. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नवनाथ काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील हे करीत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Politics News : राजकारणाचं युद्ध संपलय आता समाजकारणाचं युद्ध ; रवींद्र धंगेकर

Pandharpur News : पंढरपूर तीर्थक्षेत्राचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यास प्राधान्य ; मंत्री उदय सामंत

Pandharpur News : पंढरपूर तीर्थक्षेत्राचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यास प्राधान्य ; मंत्री उदय सामंत

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लताताई शिंदे यांनी थेऊर येथे, श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनानिमित्त दिली भेट

Monday, 26 May 2025, 22:30

गुरं बांधण्यासाठी गोठ्यात गेलेल्या 16 वर्षीय युवकाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू

Monday, 26 May 2025, 20:45

भामा आसखेड धरणाच्या कडेला मासेमारी करणाऱ्या युवकाच्या अंगावर वीज कोसळून जागीच मृत्यू

Monday, 26 May 2025, 19:37

‘हे’ फळ खाल्ल्याने पुरुषांची प्रजनन क्षमता वाढण्यास होते मदत; जाणून घ्या सविस्तर…

Monday, 26 May 2025, 19:28
Aishwarya Rai Questions Lalu Yadav Family Over Tej Pratap Scandal

तेज प्रताप यादव प्रकरणात ऐश्वर्या रायने दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या त्यांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले

Monday, 26 May 2025, 19:23
Ex MLA RT Deshmukh died in road accident latur

भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू

Monday, 26 May 2025, 18:44
Next Post

Politics News : .....म्हणून शिंदे फडणवीस सरकारने निर्णय घेतला ; आमदार रविंद्र धंगेकर

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.