(Politics News) मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारण उलथापालथ झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोस्ती मध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. दोघेही एकमेकांवर टीका सोडण्याची संधी सोडत नाहीत. मात्र आज ते दोघे एकत्र विधान भवनात एकत्रित एन्ट्री केल्याने राजकारणात मोठी (Politics News) खळबळ उडाली आहे.
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मित्रत्त्वाच्या नात्यात प्रचंड दुरावा…!
एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील बंड आणि त्यानंतर गेल्या ९ महिन्यांपासून सुरु असलेल्या राजकीय सत्तासंघर्षामुळे एकेकाळी मित्र असलेले देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंधांमध्ये वितुष्ट आले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर यथेच्छ टीका केली आहे, एकमेकांची उणीदुणी काढली आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मित्रत्त्वाच्या नात्यात प्रचंड दुरावा निर्माण झाला आहे.
मात्र, या सगळ्याला छेद देणारे चित्र गुरुवारी विधानभवनात पाहायला मिळाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी हे दोन्ही नेते विधानभवनाच्या आवारात एकत्र दिसून आले. यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यातील राजकीय हेवेदावे बाजूला ठेवता एकमेकांशी गप्पा मारल्या. दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य होते. एकमेकांशी छान गप्पा मारत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस विधिमंडळात गेले.
राजकीय सत्तासंघर्षामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजप यांच्यात प्रचंड कटुता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हसतखेळत गप्पा मारतानाचे चित्र अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारे ठरले. त्यामुळे विधानभवनाच्या आवारात घडलेल्या या प्रसंगाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. उद्धव ठाकरे हे भाजपसोबत पुन्हा जाण्याची शक्यता दुरापास्त असली तरी देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे यांच्यातील हा सुसंवाद अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!