Politics News पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चा उघड उघड केल्या जात आहे. अजित पवार यांनी त्यांचे आज सवडमधील सर्व कार्यक्रम अचानक रद्द केले. ते तिथे शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार होते. मात्र त्यांनी अचानक कार्य़क्रम रद्द केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लीला पोहचले आहेत. त्या दरम्यान बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून यामुळे अजित पवार भाजप सोबत नक्कीच जाणार असल्याचा अर्थ काढला जात आहे.
बावनकुळे म्हणाले की..!
भाजपच्या विचारधारेनुसार काम करणार असेल तर पक्षात कोणीही आले तरी हरकत नाही. भाजपमध्ये सर्वांसाठी स्थान आहे. आमच्याकडे देश देव धर्माला मानणारे आले तर त्यांचं स्वागत आहे. आमच्याकडे विचारधारेवर काम करावे लागते.” बावनकुळे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता त्यांनी अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान अजित पवार हे भाजपसोबत जाणार का या प्रश्नावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मला वाटत नाही अजित पवार हे भाजपसोबत जातील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.