Politics News पुणे : राजकारणात काहीही होऊ शकते, याचा प्रत्यय आज अजित पवारांच्या बंडानंतर आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत अजित पवार यांनी शिवसेना-भाजपशी हातमिळवणी केली. सध्याच्या राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी तिसरा घटक झाला. (Politics News) त्यांनी लागलीच राष्ट्रवादी पक्ष, चिन्हावर दावा पण सांगितला. अजित पवार यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ तर इतर ८ जणांना मंत्री पदाची लॉटरी लागली. राज्यातील राजकीय महाभूंकपाचा काँग्रेस मोठा फायदा झाला. राज्यातील चार प्रमुख पक्षांतील दोन मोठ्या पक्षांत उभी फूट पडली. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, या म्हणीप्रमाणे आपसूकच हा पक्ष राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. (Politics News)
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर लोकसभेतील बहुतांश खासदारांसह राज्यातील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले. उद्धव ठाकरे गट अल्पमतात आले. तर आता ही अजित पवार हे राष्ट्रवादीतील मोठा गट त्यांच्यासोबत असल्याचा दावा करत आहेत. या घाडमोडींचा काँग्रेसला फायदा झाला
राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. बहुमतासाठी १४५ जागांची गरज आहे. अजित पवार एनडीएचे घटक नसल्याचे गृहित धरले तर सध्या विधानसभेत पक्षीय बलाबल असे समोर येते. यामध्ये भाजपकडे सध्या सर्वाधिक १०५, त्यानंतर शिवसेना-४०, शिवसेना उद्धव ठाकरे गट – १६, राष्ट्रवादी काँग्रेस- ५३, काँग्रेसकडे ४५ आणि इतर २९ आमदार आहेत.
दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर काँग्रेसकडे सर्वाधिक ४५ आमदार असतील. भाजप १०५ आमदारांसह पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजे राज्यात भाजपनंतर काँग्रेस ही सर्वात मोठी पार्टी असेल. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना असेल. सध्या सत्ताधारी शिवसेनेचे ४० आमदार आहेत.
विधान परिषदेतील किती आमदार आणि खासदार अजित पवार यांच्यासोबत आहे, हे स्पष्ट झालेले नाही. दावे प्रतिदावे करण्यात येत आहे. अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत, त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास होईल, असा दावा केला.