Politics मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार प्रमुखपदी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची आज (दि.11) निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खासदार कोल्हेंना दिले. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ते प्रचार प्रमुख राहणार आहेत. (Politics)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या डॉ. कोल्हे यांचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील काम प्रशंसनीय आहे. पक्षावरील प्रेम, विश्वास या सर्व गोष्टी लक्षात घेता त्यांची प्रचार प्रमुखदी निवड करण्यात आली आहे. या निवडीच्या निमित्ताने पक्ष बळकट व मजबूत करण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर असणार आहे.
आदरणीय शरद पवार, सुप्रियाताई सुळेंचे आभार : डॉ. कोल्हे
माझ्यावर विश्वास दाखवत ही जबाबदारी दिल्याबद्दल आदरणीय शरद पवार साहेब, महासंसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो ! आपण सर्वांनी दाखविलेला हा विश्वास नक्कीच सार्थ ठरवेन, असे खासदार कोल्हे यांनी म्हटले आहे.