Politics शिरूर : राज्याच्या राजकारणात सत्तेसाठी महाभूकंप म्हणत राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. सध्या राज्यात मी पुन्हा येईन… हे खर करण्यासाठी भाजप सोबत राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाने उडी मारली. त्यात राष्ट्रवादी पक्षातील ९ आमदारांना मंत्री पदे देखील बहाल केली गेली. (Politics) कधीच एकत्र न येणारे दोन पक्ष एकत्रीत येऊन सत्ता स्थापन करण्याच महानाट्य विधानसभेत दिसून आले. या शपथविधीसाठी राष्ट्रवादी कॅाग्रेसचे खासदार, आमदार देखील उपस्थित होते. (Politics) शपथविधी नंतर गळाभेटी व हातमिळवणी करत अनेक दिंग्गजांनी एकत्रीत काम करण्यास मजा येईल. (Politics) असे ही सांगितले. (Politics)
दुपारच्या या शपथविधी मुळे राज्यात मोठा भूंकप झाला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे अध्यक्ष जेष्ट नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मी पुन्हा जनतेत जाणार…जनतेवर माझा विश्वास …जे गेले ते ईडी ला भिऊन गेले…असे म्हणत. यशवंतराव चव्हाण समाधी स्थळावरून पुन्हा पक्ष बांधणी करण्यासाठी दंड थोपटलेले पहावयास मिळाले.
त्याचे पडसाद हळू हळू उमटू लागले आहेत. काही ठिकाणी फटाके फुटले तर काही ठिकाणी कार्यकर्ते नॅाट रिचेबल झाल्याचे दिसून आले. काही गावात भाजप मध्ये गेलेल्या राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षातील नेत्यांना याचा परिणाम भोगावा लागेल. अशी चर्चा आहे. काही कार्यकर्त्यांनी गप्प राहण्यात धन्यता मानली. सगळे सारे एकाच माळेचे मनी, किमान राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाने भाजप मध्ये जायला नको होत. या पुढील काळात काय होईल सांगता येत नाही. सत्तेसाठी नेते काही करू लागले आहेत. असेही काहि कार्यकर्ते बोलू लागले होते.
एका गावात नेत्याच्या वतीने श्रद्धांजली वाहताना नेमके तुम्ही कोणाच्या बाजूने, याकडेच तेथील नागरिकांचे लक्ष लागले होते. काहिंनी थेट राष्ट्रवादी पक्षाकडे तर काहिंनी आपल्या नेत्याच्या वतीने श्रद्धांजली वाहिली. पण नेहमी श्रद्धांजली वाहणाऱ्या नेत्याने मात्र दोन्ही नेत्यांची महती सांगत दोन्ही बाजूने श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षात नेमक कोण कोणाच्या बाजूचे लोकांमध्ये संभ्रम होत असल्याचे दिसून येत आहे.
राज्याच्या सत्ता पटलावर काहिंना स्थान तर काहिंना हुलकावनी मिळणार हे ठरलेले गणित आहे. अशाच एका आमदाराला नेहमी सत्तेत स्थान मिळत नसल्याने त्यांच्यातून नाराजीचा सूर होता. त्यामुळे ऐनवेळी सही कशासाठी घेतली हे माहितच नसल्याची कबूली त्यांनी दिली. भाजप नेत्यासमोर झूकून केलेली हातमिळवणी या वरून खासदाराने तर थेट राजीनामा दिल्याचे महानाट्य राज्याच्या राजकारणात दिसून येत आहे. यावर सोशल मिडिया वर येणाऱ्या प्रतीक्रियांनी नागरिकांमध्ये चांगलेच मनोरंजन होऊ लागले आहे.