Politics | मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा मागच्या दोन दिवसांपासून सुरू होती. भाजपाकडे अजित पवारांच्या पक्षप्रवेशाबाबतचा कोणताही प्रस्ताव नाही, अशी प्रतिक्रिया यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘अजित पवारांच्या नेतृत्वावर कोण प्रश्न चिन्ह उपस्थित करतंय हे त्यांनीच तपासलं पाहिजे. आमच्याकडे अशी कोणतीही चर्चा सुरू नाही. अजित पवारांची कुठेही भाजपाला संपर्क केला नाही. दोन वर्षांपासून त्यांच्या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ठाकरे पवारांच्या भेटीनंतरच या चर्चांना उधाणं आलं.’
अजित पवार यांचे स्पष्टीकरण..
भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेवर अजित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिल आहे. माझ्याबद्दल आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम सुरु आहे. वास्तविक ज्या बातम्या दाखवल्या जात आहेत, त्यामध्ये काही तथ्य नाही.जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार, असे सांगत अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून भाजपसोबत जाणार असल्याच्या सुरु असलेल्या चर्चांना स्पष्टीकरण दिले आहे. मात्र अजून या प्रकरणाची चर्चा अजून तरी थांबताना दिसत नाही.