Politics | मुंबई : उद्योगपती गौतम आदानी प्रकरणावरुन देशात गदारोळ सुरु आहे. त्यांचे आणि पंतप्रधान नरेंद्रे मोदी यांच्या संबंधावरुन देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. आदानी यांचा मुद्दा काँग्रेसचे नेते आणि माझी खासदार राहुल गांधी यांनी चांगलाच उचलून धरला आहे. त्यामुळे राजकारण ढवळून निघाले आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आता याच प्रकणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला असून जहरी टीका केली आहे.
चव्हाण म्हणाले, ” उद्योगपती गौतम आदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काय संबंध आहेत, याचा पंतप्रधानांकडून खुलासा होत नाही, तोपर्यंत काँग्रेस गप्प बसणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करीत आहेत, अशी टीका चव्हाण यांनी केली.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसने भाजपाविरोधात लढा उभारायला सुरुवात…
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसने भाजपाविरोधात लढा उभारायला सुरुवात केली आहे, शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, 2019 मध्ये कर्नाटकमध्ये एका सभेत राहुल गांधी यांनी वक्तव्य केले. त्यांच्या विरोधात भाजपाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकाकर्त्यांनेच ती स्थगित ठेवण्याची विनंती न्यायालयास केली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….
Indapur News : गलांडवाडी नं. २ येथे श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्राची स्थापना