Politics | पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चांगल्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते.
राजकारण तापत असताना अजित पवारांनी भूमिका स्पष्ट करुन चर्चेला स्वल्पविराम दिला. त्यानंतरीही चर्चा सुरु आहेत. मात्र असे असताना आता अजित पवारांनी मला १०० टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल, अशी इच्छा अजित पवारांनी व्यक्त केली आहे.
आगामी २०२४ च्या निवडणुकीनंतर काय, आता म्हटलं तरी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे. असे स्पष्ट भूमिका पवारांनी जाहीर केल्याने पुन्हा एकदा अजित पवार चर्चेत आले आहेत.
यावर आता उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री होण्यास कोणाला आवडणार नाही. अजित पवारांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. ते अनेक वर्षापासून राजकारणात असून, मंत्रीही होते. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवारांनी केला आहे. असे त्यांनी जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
प्रत्येकाला वाटतं आपण मुख्यमंत्री व्हावं. अनेकजण जुगाड करून लायकी नसताना मुख्यमंत्री होतात, असे म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
“अजित पवारांनी प्रथमच मुख्यमंत्रीपदाबाबत इच्छा व्यक्त केली नाही. त्यामुळे अजित पवारांना माझ्या शुभेच्छा आहेत,” असे राऊतांनी यावेळी सांगितले.