Political News : जळगाव : ठाकरे गटाच्या माजी प्रवक्त्या आणि आमदार मनिषा कायंदे यांनी रविवारी शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. यामुळे विधान परिषदमध्ये त्यांचे संख्याबळ कमी झाले आहे. मनिषा कायंदे या विधानपरिषदेच्या विद्यमान आमदार आहेत. असं असताना त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.(Political News)
आमदार मनिषा कायंदे यांनी रविवारी शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे.
उज्ज्वल निकम म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता शिवसेना हा अधिकृत पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी आपण शिंदे गटामध्ये प्रवेश करीत आहोत असं जाहीर केलं असलं तरी ती अपात्रता मानली जात नाही. कारण मी शिवसेनेतच आहे, (Political News)मी शिवसेना सोडलेली नाही, असा युक्तिवाद त्या करू शकतात. त्यामुळे दहाव्या परिशिष्टानुसार मनीषा कायंदे अपात्र होऊ शकतात किंवा नाही याचा निर्णय विधानपरिषदेच्या सभापतींना घ्यावा लागेल, असंही निकम यांनी सांगितले.(Political News)
कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने विधान परिषदमध्ये त्यांचे संख्याबळ कमी झाले आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसने आता विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. यावर बोलताना निकम म्हणाले, विधान परिषदेत सध्या ठाकरे गटाचे नऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेही नऊ आमदार आहेत. दोन्ही पक्षांचे संख्याबळ समसमान आहे. (Political News)सध्या विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाकडे आहे. परंतु त्यावर आता राष्ट्रवादीने जर दावा केला तर याचा गुंताही विधान परिषदेच्या सभापतींना सोडवावा लागेल. अर्थात यासाठी विधान परिषदेचे सभापती कोणता मार्ग निवडतात, कुठली पद्धत अवलंबतात, हे पाहावं लागेल. विरोधी पक्षाकडे विरोधी पक्षनेते पदासाठी अधिकचं संख्याबळ कोणाकडे आहे? याचाही निर्णय सभापतींना घ्यावा लागेल, असं निकम म्हणाले.(Political News)
दरम्यान, मनिषा कायंदे यांचे पक्षात स्वागत करून भावी कारकिर्दीकरता शुभेच्छा देत त्यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असून, पक्षाचा विस्तार करण्यासाठी तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी कायंदे यांच्याकडे व्यक्त केली, असं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.(Political News)