Political News: मुंबई : शिंदे सरकारचा सध्या उधळपट्टीचा कारभार सुरु आहे. बेधडकपणाने महापालिकेचा पैसा उधळला जातोय. जी-२० च्या नावाने लुटालूट सुरु आहे. आतापर्यंत जवळपास सात ते नऊ हजार कोटी रुपये वापरण्यात आले आहेत, अशी माहिती मला मिळाली आहे. हा जनतेचा पैसा आहे आणि या जनतेच्या पैशाची लूट, त्याचा हिशोब जनतेला द्यावाच लागेल. त्या हिशोबाचा जाब विचारण्यासाठी शिवसेना मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.(Political News)
शिंदे सरकारचा सध्या उधळपट्टीचा कारभार सुरु आहे.
उद्धव ठाकरे यांनी दादर येथील शिवसेना भवनमध्ये माजी नगरसेवकांची बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ठाकरे म्हणाले की, महापालिका निवडणूका लांबल्या आहेत.(Political News) त्यामुळे येथे लोकप्रतिनिधी नाहीत. महापालिकेच्या पैशांची सध्या लूट चालू आहे. विचारणारे कोणी नाही. महापालिकेची निवडणूक न झाल्यामुळे लोकांची सेवा करायची कशी? हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे. ज्या वेळेला महापालिकेमध्ये जनतेचे प्रतिनिधी असतात, तेव्हा तिथे प्रशासन प्रस्ताव पाठवत असतात. प्रतिनिधी असतात त्यांच्यासोबत त्याच्यावर चर्चा होते. मंजुरी, नामंजूरी मिळते आणि नंतर प्रस्ताव मार्गी लागतात.(Political News)
परंतु, आता या ना त्या नावाने मुंबईकरांच्या पैशांची लुटालूट चालू आहे. मुंबईला कोणी मायबाप राहिलेला नाही. एक काळ असा होता की मुंबई महापालिका तुटीमध्ये होती. त्याच्यानंतर शिवसेनेकडे सत्ता आली. तेव्हापासून आत्तापर्यंत जवळपास ९० हजार कोटींच्या ठेवीपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत भर पडली. मुंबईकरांचे हे पैसे जनतेच्या उपयोगाच्या कामांसाठी वापरण्यात येणार आहेत. पण, आता मात्र कोणतेही काम असले तरी बेधडकपणाने महापालिकेचा पैसा वापरला जातोय. आतापर्यंत जवळपास सात ते नऊ हजार कोटी वापरण्यात आले आहेत.
जनतेच्या पैशाचा हिशोब जनतेला द्यावाच लागेल. त्याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना विराट मोर्चा काढणार आहे. महापालिकेतल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा काढणार असून, या मोर्चाचे नेतृत्व आदित्य ठाकरे करेल. येत्या १ जुलै रोजी हा मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.(Political News)