गणेश सुळ
Political News : केडगाव : दौंड चे आमदार राहूल कुल हे सत्तेत असल्याने तालुका, जिल्हा आणि राज्याला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांची मांडणी योग्यपद्धतीने करून शासनाचे लक्ष वेधत ही सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लावीत आहेत. प्रश्न व समस्यांची शासन दरबारी होणारी मांडणी सध्या जनतेमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. (Political News)
अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताच्या बाजू मांडल्या
आमदार कुल यांनी ग्रामीण भागातील पाण्याची समस्या, रस्त्यांची समस्या, शेतकऱ्यांना भेडसावणारी रात्रीच्या विजेची समस्या, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्याचे निरसन याबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्ये शासनाने धनगर समाज बांधवांसाठीची मल्हारराव होळकर महामेष योजना सुरू केली आहे. त्या पाठोपाठ शेतकरी आणि जनतेच्या हितासाठीचे विविध निर्णय घेतले असल्याने राज्य शासनाचे त्यांनी आभार मानले आहे. (Political News)
आमदार कुल यांनी पावसाळी अधिवेशन 2023 मध्ये शासनाकडे मागणी करताना, ग्रामीण भागातील नळ पाणी पुरवठा योजनांच्या नियोजनामध्ये बारकाईने लक्ष द्यावं, ग्रामीण भाग व शहरी भागातील दरडोई पाणी वापराबाबत मापदंडामध्ये असलेली तफावत दूर करावी. ग्रामीण भागावरील अन्याय दूर करावा. ग्रामीण मार्गांच्या निधीमध्ये वाढ करावी अशी मागणी केली आहे. याबरोबरच जलसंपदा विभागाच्या विविध समस्यांबाबत त्यांनी मनोगत व्यक्त करताना जलयुक्त शिवार योजना, कृष्णा भीमा स्थिरीकरण, मुळशी धरणाचे पाणी पूर्वेकडे वळविणे आदी महत्वपूर्ण प्रकल्पाना शासनाने गती द्यावी. चिबड जमिनींचा प्रश्न वर्षानुवर्षे दुर्लक्षित असून याबाबत मापदंड निश्चिती करण्यात यावी. राखीव वने शेरा हटविण्यात यावा. पुरंदर उपसा, जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनां आदी योजना बंद नळीद्वारे करण्यात याव्या. आदी प्रमुख मागण्याही केल्या आहेत. (Political News)
जनतेचा सेवक म्हणून अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताच्या बाजू मांडल्या असल्याने त्यांच्या या अभ्यासू वृत्तीचा सर्वसामान्य जनतेला व शेतकरी वर्गाला होणार आहे.