Political News : मुंबई : राजकारणात काहीही होऊ शकते, याचा प्रत्यय काल (ता. २) अजित पवारांच्या बंडानंतर आला. अजित पवार यांनी शिवसेना-भाजपशी हातमिळवणी केली. सध्याच्या राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी तिसरा घटक झाला. त्यांनी लागलीच राष्ट्रवादी पक्ष, चिन्हावर दावा सांगितला. अजित पवार यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ तर इतर ८ जणांना मंत्री पदाची लॉटरी लागली. राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच आम्ही सरकारमध्ये सहभागी झाल्याचं अजित पवारांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, भाजपला पाठिंबा देण्याच्या निर्णयाला समर्थन नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी नेमकी कोणाची आणि सर्वाधिक आमदार-खासदार आणि पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा कोणाला, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. दरम्यान, येत्या ५ जुलै रोजी राष्ट्रवादीचे दोन्ही प्रमुख नेते मुंबईत आमने-सामने येणार आसल्याची माहिती मिळत आहे. आता दोघांपैकी कोणाकडे किती आमदार हे याचदिवशी स्पष्ट होईल, अशी चर्चा आहे.(Political News)
अजित पवार यांनी शिवसेना-भाजपशी हातमिळवणी केली.
दरम्यान, शरद पवार यांनी बुधवारी (ता. ५ जुलै) दुपारी १ वाजता, मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पक्षाची बैठक आयोजित केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंतपाटील यांनी सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी, फ्रंटल सेल राज्यप्रमुख, सर्व तालुकाध्यक्ष, इतर पदाधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आले आहे.(Political News) दुसरीकडे, अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांकडूनही ५ जुलै रोजीच आपल्या गटाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईतच बोलावल्याची माहिती आहे. त्यामुळे पदाधिकारी बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचं निश्चित झालं आहे.(Political News)
काही आमदारांनी कोणतीही माहिती न देता कागदांवर स्वाक्षरी केल्याचे सांगितले. पक्षाच्या मान्यतेशिवाय सत्तारूढ पक्षाकडे जाऊन काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर काही आमदार, पक्ष कार्यकर्त्यांनी शपथविधीच्या घटनेचा निषेध केला. जे आमदार प्रत्यक्ष उपस्थित होते, त्यांना बोलावून घेतले. त्यांनी कोणत्या कागदांवर स्वाक्षरी घेतली, याची माहिती आम्हाला अद्याप समजली नसल्याचे सांगितले. तर काही आमदारांची दिशाभूल झाल्याचे सांगण्यात आले.(Political News)
दरम्यान, या सर्व घटना-घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने ५ जुलै रोजी तालुका अध्यक्ष, राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. या वेळी अजित पवार यांच्यासोबत तीस आमदार आहेत, असे त्यांचे समर्थक सांगत असले तरी ते नक्की ३० आहेत की त्यापेक्षा अधिक आहेत, की कमी आहेत, याची नेमकी माहिती मिळेल. सध्या दोन्ही बाजूंनी याची चाचपणी घेण्याचे काम सुरू आहे.(Political News)