Political News :मुंबई : शिवसेनेच्या वर्धापनदिना निमित्त घेण्यात आलेल्या मेळाव्यात रामदास कदम यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्याला संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रामदास कदम शिवसेनेत होते त्यावेळी ते आमच्या घरी यायचे. राऊत साहेबांकडे माझी राष्ट्रवादीत शरद पवारांकडे वर्णी लावा, म्हणजे माझं बस्तान चांगलं बसेल, अशी विनवणी रामदास कदम करायचे. परंतु, संजय राऊत यांनी रामदास कदम यांना सेनेतच राहण्याचा सल्ला दिला, असा गौप्यस्फोट आमदार सुनील राऊत यांनी केला. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.(Political News)
रामदास कदम यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.
राऊत म्हणाले की, शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये त्यांना मंत्री बनविले. वडिलांना आमदार बनवले. तर मुलाला विधानसभेची उमेदवारी देऊन त्यालाही आमदार केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये मात्र त्यांना मंत्रिमंडळात घेतले नाही. त्यामुळे हा नेता नाराज झाला होता. त्याची पावले राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिशेने वळत होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी तो नेता इच्छुक होता. त्यासाठी तो नेता सतत आमच्या घरी यायचा. राष्ट्रवादीमध्ये घेण्यासाठी शरद पवार यांच्याकडे माझी वर्णी लावा, अशी विनंती करायचा असा गौप्यस्फोट सुनील राऊत यांनी केला आहे.(Political News)
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील एकोप्यामुळेच राज्यात महाविकास आघाडीचा नवा पर्याय उभा राहिला. भाजपला दूर सारत राज्यात सत्ता स्थापन केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.(Political News) पण, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ खासदार आणि ५० आमदार, अनेक नेते, पदाधिकारी गेले. यात शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचा मुलग दापोलीचा आमदार योगेश कदम यांचाही समावेश होता. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर सातत्याने टीका केली.
शिवसेनेच्या वर्धापनदिना निमित्त घेण्यात आलेल्या मेळाव्यात रामदास कदम यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्याला संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. तसेच रामदास कदम यांनी संजय राऊत यांना निष्ठा शिकवण्याची गरज नाही, असे ठणकावून सांगितले.(Political News)