Political News : मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय, ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीनं धाड टाकली आहे. कोरोना काळातील लाईफलाईन कंपनी घोटाळा प्रकरणी छापे टाकले जात आहेत. मुंबईत पंधराहून अधिक ठिकाणी छापा टाकला जात असून, बीएमसी कोविड घोटाळ्याशी संबंधित हे छापे आहेत. बीएमसीचे वरिष्ठ अधिकारी, पुरवठादार आणि शहरात कोविड मशिन्स उभारण्यासाठी मदत करणाऱ्या लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकले गेले आहेत.(Political News)
सचिव सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीनं धाड टाकली आहे.
सूरज चव्हाण यांच्या चेंबुरमधील निवासस्थानी ही छापेमारी करण्यात आली आहे. के के ग्रँड या चेंबुरमधील इमारतीत अकराव्या मजल्यावर सूरज चव्हाण राहतात. या ठिकाणी ईडीने धाड टाकली आहे. सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ईडीच्या पाच अधिकाऱ्यांचे पथक चव्हाण यांच्या घरी दाखल झाले आणि चौकशी सुरू झाली.(Political News)
ईडीने प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनाही याआधी चौकशीसाठी बोलावले होते. नुकतीच मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची चौकशी लावण्याची घोषणा केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेना सचिव सुरेश चव्हाण, (Political News) आयएएस संजीव जयस्वाल यांच्यासह १६ ठिकाणांवर छापा टाकला आहे. सुरेश चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांच्या निवासस्थानी ईडीचे पथक पोहोचले आहे.
भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी या धाड प्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, कोविडच्या काळात त्याठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून जो घोटाळा, भ्रष्टाचार झाला होता त्यावरून कारवाई होत असेल. त्या काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जो खर्च झाला त्या काळात जे अधिकारी होते त्यांनी खर्च कसा केला याची चौकशी होत असेल.(Political News)
दरम्यान, कोरोनाच्या काळात लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीकडून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. कोविड सेंटर आणि वैद्यकीय उपकरण खरेदी कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. या प्रकरणी ईडी आज चौकशी करत आहे.
कोरोना घोटाळा प्रकरणी राज्य शासनानं एसआयटी गठीत केली आहे. यामार्फत चौकशी केली जाणार आहे. उद्धव ठाकरे यांनी काल घेतलल्या पत्रकार परिषदेत १ जुलैला मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं. (Political News) त्यानंतर आज सकाळी ईडीनं धाडसत्र सुरू केलं आहे. त्यामुळे या चौकशीमागे राजकीय गोष्टी आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे.
भाजप आणि शिंदे गट हे सूडाचं राजकारण करत आहेत. पण आमचे नेते हे स्वच्छ आहेत. त्यांनी काहीही केलेलं नाही. त्यामुळे कितीही चौकशी केली तरी यांना काहीही सापडणार नाही. आमचे नेते यातून सुटतील, अशी भावना सूरज चव्हाण यांच्या घराजवळ जमलेल्या शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.(Political News)