Political News : मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सोशल मीडियावर जीवे ठार मारण्याची धमकी आली आहे. तसंच बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांना या संदर्भात फोन आला होता. थेट पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने दिल्ली पोलीसही सजग झाले आहेत.(Political News)
अमित शहा यांना सोशल मीडियावर जीवे ठार मारण्याची धमकी आली आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी एक समिती गठीत केली असून, या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. बाह्य जिल्हा पोलिसांच्या पीसीआरला आज सकाळी एक फोन आला. या फोनमध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह आणि नितीश कुमार यांनी मारण्याची धमकी देण्यात आली, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. सोशल मीडियावर याआधी या दोघांनाही आक्षेपार्ह विधाने तसेच शिवीगाळ करण्यात आली होती.(Political News)
पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना धमकी देण्यात आल्याने दिल्ली पोलीस सतर्क झाले आहे. या प्रकरणाची ते कसून चौकशी करत आहेत. पोलिसांना आलेला फोन, (Political News)फोन करणारा युवक संजय वर्मा याचीही पोलीस चौकशी करत आहेत. हा फोन त्याने का केला? कुणाच्या सांगण्यावरून केला? याचा पोलीस शोध घेत आहेत.
धमकीचा फोन करणाऱ्या तरूणाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. संजय वर्मा असे या तरूणाचे नाव आहे. संजय हा दिल्लीतील मादीपूर भागातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. वर्मा याच्या कुटुंबाने सांगितले की, तो कालपासूनच दारू पित आहे. तो नशेत आहे. याच नशेत त्याने फोन केला असावा, असं संजयच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे.(Political News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर आहेत. तिथे मोदींना एसपीजी आणि अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसेसची सुरक्षा आहे. अमित शाह यांच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांवर आहे. प्रोटोकॉलनुसार त्यांना झेड सुरक्षा आहे.
१५ जून रोजी सकाळी नितीश कुमार मॉर्निंग वॉक करत असताना सर्क्युलर रोडवर नितीश कुमार मॉर्निंग वॉक करत होते. मॉर्निंग वॉक करत असतानाच पटनातील मुख्यमंत्री निवासस्थान परिसरात अचानक दोन बाईकस्वार घुसले. त्यांनी गाडी नितीश कुमार यांच्याजवळ नेली. पण धोका लक्षात आला आणि नितीश कुमार लगेचच पदपथावर चढले आणि अपघातातून थोडक्यात बचावले.(Political News)