Political News : मुंबई : राष्ट्रवादीचो नेते अजित पवार यांनी नुकतेच विरोधी पक्षनतेपदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा, अस सांगत अन्य कोणतीही जबाबदारी मला द्या मी घ्यायला तयार आहे, असे विधान केले होते. दरम्यान, अजितदादांना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्याची कार्यकर्त्यांनी जोरदार मागणी केली आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाल्यास पक्षाला बळ मिळेल, असं कार्यकर्ते म्हणताना दिसत आहेत. तर दुसरीकडे भाजपने एक नवा दावा केला आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राष्ट्रवादी सोडणार असल्याचा भाजपचा दावा आहे.(Political News)
जयंत पाटील हे राष्ट्रवादी सोडणार असल्याचा भाजपचा दावा आहे.
दरम्यान, भाजपने ट्विट करत जयंत पाटील राष्ट्रवादी का सोडणार? याची दहा कारणेच समोर ठेवली आहेत. भाजपचं हे ट्विट व्हायरल होत असून, आता जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार की राष्ट्रवादीतच राहणार, अशी चर्चा रंगत आहे.(Political News)
भाजपने दिलेल्या कारणांची यादी
– राष्ट्रवादीत दोन गट आहेत. एक सुप्रिया सुळे यांचा आणि दुसरा अजित पवार यांचा. जयंत पाटील या दोन्ही गटात बसत नाहीत. त्यामुळेच त्यांचं राष्ट्रवादीतील भविष्य अंधारातच राहिलं.
– एकेकाळी गृहमंत्रीपद भूषविलेल्या जयंत पाटील यांना गृहमंत्रीपद देण्याऐवजी जलसंधारण मंत्रीपद दिलं. शरद पवार यांनी २०१९ नंतर जयंत पाटील यांना झुलवत ठेवलं.
– जयंत पाटील हे महत्त्वकांक्षी नेते आहेत. पण त्यांना आपण केवळ नामधारी प्रदेशाध्यक्ष असल्याचं वाटतंय. कारण सुप्रिया सुळे आता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा झाल्या आहेत. तर राज्य स्तरावरील सर्व निर्णय अजित पवार घेत आहेत. त्यामुळे जयंत पाटील अस्वस्थ आहेत.
– सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवार यांची नजर आता प्रदेशाध्यक्षपदावर आहे. प्रदेशाध्यक्षपद अजित पवारांकडे गेलं तर जयंत पाटील जाणार कुठे?
– महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर जयंत पाटील यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं जाऊ शकलं असतं. पण शरद पवार यांनी तसं केलं नाही.
शरद पवार यांनी पक्षातील दोन्ही गटांना खूश केलं. सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष केलंय. तर प्रफुल्ल पटेल यांनाही कार्यकारी अध्यक्ष केलंय. प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांच्या जवळचे आहेत. (Political News)ही निवड करताना जयंत पाटील यांचा विचार झाला नाही.
– शरद पवार यांनी राजकारणातून पूर्णपणे निवृत्ती घेतली तर जयंत पाटील हे त्यांच्यापेक्षा ज्युनिअर असलेल्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या हाताखाली कसे काम करतील?
– जयंत पाटील यांना आपला मुलगा प्रतिक पाटील याला राजकारणात आणायचं आहे. त्यासाठी त्यांना मुलाला राजाराम बापू साखर कारखान्याचा अध्यक्षही केलं आहे. पण शरद पवार यांच्याकडून जयंत पाटील यांना काहीच प्रतिसाद मिळताना दिसत नाही.
– शरद पवार यांनी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याकडे कोणतीही संघटनात्मक जबाबदारी दिलेली नाही. मग जयंत पाटील यांच्या मुलाला काय मिळणार?
– या सर्व कारणांचा विचार करता, जयंत पाटील यांना राष्ट्रवादीत आपलं आणि मुलाचं भवितव्य दिसत नाही.
– शरद पवार यांच्या राजीनामाच्या वेळी जयंत पाटील यांनी भलेही रडण्याचा ड्रामा केला असेल पण वास्तविक जयंत पाटील राष्ट्रवादीत वैतागले आहेत. त्यामुळेच ते लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देऊ शकतात.(Political News)