Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Political News : जागतिक नेत्यांत पंतप्रधान मोदी सर्वाधिक लोकप्रिय… बायडेन, सुनक यांना सारले मागे!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 26 June 2023, 12:51

Political News : नवी दिल्ली : नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्व नेत्यांना मागे टाकलं आहे. मोदी यांच्या नावाचा डंका जगभरात वाजतो आहे. जगभरातील ७६ टक्के लोकांनी मोदींना जगातील सर्वोत्कृष्ट आणि लोकप्रिय जागतिक नेता म्हणून मत दिलं आहे. या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन ४१ टक्के मतांसह सातव्या स्थानावर आहेत, तर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना ३४ टक्के मतं मिळाली असून, ते तेराव्या स्थानावर आहेत. लोकसभा निवडणुका जवळ येत असताना मोदींसाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आवडणाऱ्या प्रत्येकासाठी ही आनंदाची बातमी आहे. World Of Statistics या ट्विटर हँडलने याविषयीची आकडेवारी दिली आहे.(Political News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्व नेत्यांना मागे टाकलं आहे.

बिझनेस इंटेलिजन्स कंपनी, मॉर्निंग कन्सल्टनं त्यांचं नवं सर्वेक्षण ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगचे आकडे प्रसिद्ध केले आहेत. ज्यामध्ये पीएम मोदी, जो बायडन, ऋषी सुनक, लोपेज ओब्राडोर यांच्यासह जगातील २२ मोठ्या नेत्यांची नावं आहेत.(Political News)  संस्थेनं २२ मार्च ते २८ मार्च या कालावधीत हे सर्वेक्षण केलं आहे. त्याची आकडेवारी ३० मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या सर्वेक्षणातील रेटिंगमध्ये पंतप्रधान मोदींना सर्वोकृष्ट रेटिंग मिळालं असून, सर्वेक्षणानुसार त्यांचं सर्वात लोकप्रिय नेते म्हणून वर्णन करण्यात आलं आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर ८९.५ मिलियन ऑफोअर्स आहेत. जगातले सर्वात लोकप्रिय नेते असा त्यांचा लौकिक आहे. काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी जी मन की बात करतात, (Political News) त्यामुळे त्यांची लोकप्रियता इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात रेडिओ हा आऊटडेटेड वाटत असला तरीही त्यावरुन मोदी संवाद साधतात. ही बाब अनेकांना भावली आहे, त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत भर पडली आहे. या माध्यमातून लोकांशी संवाद साधणं हे लोकांना भावलं आहे. प्रत्येक मन की बात हे भाषांतरित केलं जातं. ते राष्ट्रीय स्तरावर आणि जागतिक स्तरावर ऐकलं जातं.(Political News)

 

जागतिक नेत्यांच्या या रेटिंगमध्ये मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर दुसऱ्या स्थानावर आहेत, त्यांना ६१ टक्के मतं मिळाली आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज ५५ टक्के मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अलेन बारसेट ५३ टक्के मतांसह चौथ्या स्थानावर आहेत. इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला डी सिल्वा ४९ टक्के मतांसह पाचव्या क्रमांकावर आहेत.(Political News)

मॉर्निंग कन्सल्टंटच्या यादीत समाविष्ट २२ देशांच्या प्रमुख नेत्यांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, ब्राझील, कॅनडा, झेक प्रजासत्ताक, फ्रान्स, जर्मनी, भारत, आयर्लंड, इटली, जपान, मेक्सिको, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स या देशांचा समावेश आहे.(Political News)

ऑगस्ट २०२२ मध्येही अशाच पद्धतीचा एक सर्व्हे करण्यात आला होता. त्यावेळीही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच क्रमांक एकवर होते. ७५ टक्के रेटिंगसह त्यांना सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून पसंती दर्शवली होती. मॉर्निंग कंसल्टने ही टक्केवारी सादर केली होती.(Political News)

कोणत्या नेत्याला किती टक्के मतं
१. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी : ७६ टक्के

२. मेक्सिको, एंद्रेस मॅन्युएल लोपेज ओब्राडोर : ६१ टक्के

३. एंथनी अल्बनीज, ऑस्ट्रेलिया : ५५ टक्के

३. एलेन बेर्सेट, स्विट्जरलँड : ५३ टक्के

५. जॉर्जिया मेलोनी, इटली : ४९ टक्के

६. लूला डी सिल्वा, ब्राजील : ४९ टक्के

७. जो बायडेन, अमेरिका : ४१ टक्के

८. अलेक्जेंडर डी क्रू, बेल्जियम : ३९ टक्के

९. जस्टिन ट्रूडो, कनाडा : ३९ टक्के

१०. पेड्रो सांचेज, स्पेन : ३८ टक्के

११. ओलाफ स्कोल्स, जर्मनी : ३५ टक्के

१२. लिये वराडकर, आयरलँड : ३५ टक्के

१३. ऋषि सुनक, ब्रिटन : ३४ टक्के

१४. माटुस्ज मोराविकी, पोलँड : ३३ टक्के

१५. उल्फ क्रिस्टर्सन, स्वीडन : ३० टक्के

१६. कार्ल नेहमर, ऑस्ट्रिया : ३० टक्के

१७. जापानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा : २९ टक्के

१८. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर : २८ टक्के

१९. नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूत : २६ टक्के

२०. पंतप्रधान पीटर फियाला : २३ टक्के

२१. इमॅनुएल मॅक्रों, फ्रांस : २२ टक्के

२२. साउथ कोरियाचे राष्ट्रपति यूं सुक येओल : १९ टक्के

कसं केलं जातं हे सर्वेक्षण?

मॉर्निंग कन्सल्टनुसार, हा नेत्यांच्या लोकप्रियतेसंदर्भातील डेटा देशातील प्रौढांच्या सात दिवसांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे. मॉर्निंग कन्सल्ट दररोज २०,००० पेक्षा जास्त जागतिक मुलाखती घेते. मुलाखतीत मिळालेल्या उत्तरांच्या आधारे, जागतिक नेत्यांबद्दल तयार केलेला डेटा तयार केला जातो. अमेरिकेत त्याचा नमुना आकार ४५,००० हजार आहे. दुसरीकडे, इतर देशांचा नमुना आकार ५०० ते ५००० च्या दरम्यान आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16
Next Post

Ashadhivari News : आषाढी यात्रेला राजकीय रंग चढणार; तेलंगणाचे मुख्यमंत्री ३०० गाड्यांच्या ताफ्यासह सोलापुरात करणार ग्रॅंड एन्ट्री!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.