Political News : पुणे : आम्ही स्वाभिमानी मराठी, गद्दारांना पाठवू गुवाहटी… चले जाव,चले जाव.. गद्दार गुवाहटी चले जाव… महाराष्ट्र त्रस्त.. खोके घेऊन गद्दार मस्त… गद्दार हटाव-महाराष्ट्र बचाव… अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली झाशीची राणी चौकात मंगळवारी आंदोलन करण्यात आले.(political News)
प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली झाशीची राणी चौकात मंगळवारी आंदोलन करण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारमधील चाळीस आमदारांनी बंड पुकारात राज्यात स्थापन केलेल्या सत्तेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘गद्दार दिन’ पाळत ‘पन्नास खोके एकदम ओके’ आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.(political News)
प्रदीप गायकवाड, बाळासाहेब बोडके, महिला शहराध्यक्ष मृणालिनी वाणी, किशोर कांबळे, राकेश कामठे, सुषमा सातपुते, महेश हांडे, उदय महाले, राजू साने, अर्चना कांबळे या वेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस गद्दार आमदारांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि सर्वसामान्य जनतेसोबत गद्दारी करत सरकार पाडले होते. महाविकास आघाडी सरकारला खाली खेचत गद्दारांनी भारतीय जनता पक्षाला साथ दिली. गेल्या वर्षभरात गद्दार आमदारांना कामाचा ठसा उमटविता आलेला नाही. (political News)राज्यातील रोजगार, उद्योग अन्यत्र गेले. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे आगामी निवडणुकीत गद्दारांना जागा दाखवावी लागेल, असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.(political News)