(Political News) बारामती, (पुणे) : अनिल देशमुख यांच्या घरावर १०९ वेळा छापा मारला गेला आहे. त्यातच ९५ टक्के कारवाया या विरोधी पक्षावर बदला घेण्यासाठी या संस्थांचा वापर केला जातो आहे, हे दर्दैवी आहे. तसेच संविधान विरोधात आहे.
लोकसभेत आवाज उठविणार…
याविषयी लोकसभेत आवाज उठविणार असल्याचे प्रतिपादन बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.बारामती येथील एका कार्यक्रमानिमित सुप्रिया सुळे आल्या होत्या, त्यावेळी त्यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सुळे यांनी संताप व्यक्त केला.
इडी आणि सीबीआयची रेड होणार आहे, हे आधी कसे कळतं. हे आधी कळत असेल तर या राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, त्यावर अमित शाह यांनी कमिटी नेमली पाहिजे. आणि देशाला उत्तर दिले पाहिजे की, या लिकेजेस कशा होतात. संजय राऊत यांच्या केसची ऑर्डर बघा. अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटीचा आरोप केला आणि आता १ कोटीचा आरोप आहे.. मग ९९ कोटींचे काय झालं? आरोप करायचा आणि पळून जायचे, ही भारतीय संस्कृती नाही. सत्तेचा गैरवापर करून लोकांना भीती दाखवत असाल तर ती महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे ही सुळे यांनी याळी सांगितले.
पुढे त्या म्हणाल्या की, ”सातत्याने केंद्र सरकारकडून विरोधकांवर यंत्रणा राबवल्या जात आहेत. हे संविधानाच्या बाहेरच्या चौकटीत जाऊन हे सर्व सुरु आहे. दडपशाहीच्या दिशेने प्रवास सुरु आहे का? अशी शंका येऊ लागली आहे. मात्र, आता ही शंका न राहता खरंच त्या दिशेने पाऊल जात असल्याचे दिसून येत आहे.”
दरम्यान, मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे घटक आहेत. देशमुख, खडसे, राऊत, नवाब मलिक यांच्यावर ज्या पद्धतीने अन्याय असून चुकीच्या पद्धतीने कारवाई होत आहे. देशातील ईडी सीबीआयच्या ९५ टक्के कारवाई या विरोधकांवरील आहेत. संविधानाचा सन्मान न करता केंद्र सरकार काम करत आहे.” असा आरोप त्यांनी केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
शिवसेना नेत्याचा सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप ; महादेवाचं दर्शन घेण्यावरुन टीका
दौंड तालुक्यातील वरवंड येथे पोलीस चौकी स्थापन करावी ; खासदार सुप्रिया सुळे