Political News: मुंबई : ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या वर्धापनदिनी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला होता. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात एक क्लिप ऐकवली होती. यामध्ये देवेंद्र फडणवीस कोविड लसीसंदर्भात विधान करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ‘अर्धवटराव’ अशी उपमा देत खोचक टीका केली होती. त्यावर आता उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे यांनी फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे. मला अर्धवटराव म्हणत असतील तर देवेंद्र फडणवीस काय आवडाबाई आहेत का?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. पण सध्या देवेंद्र फडणवीस हे ना-आवडाबाई झाले आहेत, असं ठाकरेंनी म्हटलं आहे.(Political News)
देवेंद्र फडणवीस हे ना-आवडाबाई झालेत;
देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर आपल्याच भाषणाचा एक व्हिडीओ ट्वीट केला होता. त्यावर “अर्धवटराव, मी काय म्हणालो होतो ते पूर्ण ऐकलंच नाही. असो. आता ऐका. याच अर्धवटपणामुळे तुम्हाला पानिपत शब्द अलिकडे अधिक आठवायला लागला आहे. म्हणून म्हणतो स्क्रिप्टरायटर बदला!” अशी पोस्टही देवेंद्र फडणवीसांनी केली होती. यावरून उद्धव ठाकरेंनी टोला लगावला होता. या टीकेला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.(Political News)
“काल मी माझ्या भाषणात एक क्लिप ऐकवली. देवेंद्र फडणवीस असं बोलू शकतात यावर माझा विश्वास बसत नव्हता. ती क्लिप कुणी मॉर्फ्ड केली होती का? हे त्यांनी शोधावं. ते या क्लिपमध्ये म्हणतात की ‘मोदींनी लस तयार केली नसती तर?’ मोदींनी लस तयार केली? मला वाटत नाही की मोदी असं बोलले असतील. त्यावर ते मला अर्धवटराव म्हणाले”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.(Political News)
बऱ्याच दिवसांनंतर मुंबईतील नगरसेवकांची बैठक घेतली. मुंबई महापालिका विसर्जित करून आता जवळपास एक वर्ष होऊन गेलं आहे. पण निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. निवडणूका घेण्याची हिंमत आताचं बेकायदेशीर सरकार करत नाही. महापालिकेत पैसा उधळला जातोय. त्याला जाब विचारणारं कुणीच नाही.(Political News) जेव्हा महापालिकेत लोकांचे प्रतिनिधी असतात. तिथं चर्चा होते. तिथं एखाद्या निर्णायाला मंजुरी किंवा ना-मंजुरी दिली जाते. पण आताची परिस्थिती पाहिली तर वारेमाप खर्च केला जातोय. त्यावर कुणाचं नियंत्रण नाही. या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी, जाब विचारण्यासाठी येत्या एक जुलैला ठाकरे गट महापालिकेवर मोर्चा काढणार आहे. आदित्य ठाकरे आणि इतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते या मोर्चाचं नेतृत्व करतील, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. समुद्राचं खारं पाणी गोडं पाणी करण्याबाबतचा प्रकल्प सरकारने रोखला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.(Political News)
“अर्धवटराव हे पात्र कुणाचं? रामदास पाध्ये, बोलका बाहुला. आता ते मला अर्धवटराव म्हणत असतील तर हे दिल्लीश्वरांचे आवडाबाई आहेत का? कारण पाध्येंची दोन पात्रं होती.. अर्धवटराव आणि आवडाबाई.. पण तेही दिसत नाही. आता ते नावडाबाई झाले आहेत. मोदींनी लस तयार केली या वाक्याला काही अर्थ आहे का? म्हणे पूर्ण क्लिप ऐकवली नाही, पण ते वाक्य तर आहे ना? ते नसते तर आपण कटोरा घेऊन बसलो असतो वगैरे.. कोणत्या जगात तुम्ही आहात? लोकांना मूर्ख का समजता?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केला आहे.(Political News)
मी मुख्यमंत्री असताना एकरकमी चेक देऊन लस खरेदी करण्याची तयारी दाखवली होती. पण नाही दिल्या. पण आम्ही कधी केंद्रावर दोषारोप केलेले नाहीत. केंद्रानं पीपीई किट कुठून आणले? त्याची खरेदी कशी झाली? त्यात घोटाळा झाला का? रेमडेसिवीर कुठून आणली? टेंडर काढले होते का? हे कुठे आम्ही विचारतोय?” असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीवर जात माथा टेकवला. त्यावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. जेव्हा आमची युती होती तेव्हा लालकृष्ण आडवाणी सुद्धा जिन्नाच्या कबरीवर नतमस्तक झाले होते आणि नवाज शरीफच्या वाढदिवसाला सुद्धा केक खायला आपले पंतप्रधान गेले होते. त्यामुळे मला वाटतं की स्वच्छ आणि एका विचाराने पुढे जाण्याची गरज आहे. लोकांना इतिहासात अडकवून ठेवण्याची गरज नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
गद्दारांकडे स्वत:ची ताकद देखील नाहीये. त्यांना ताकददेखील चोरावी लागत आहे. त्यांना सरकारी यंत्रणा आणि पोलिसांची ताकद लावावी लागते आहे. मग स्वत:तील मर्दुमकी कुठंय?, असा सवाल ठाकरेंनी शिंदे गटाला विचारला आहे.(Political News)