Political News : मुंबई : राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी, मला विरोधी पक्षनेतेपदातून मुक्त करा, आपल्याला या पदामध्ये रस नाही, असं वक्तव्य केलं होतं. पक्ष संघटनेमध्ये काम करायची इच्छाही अजित पवारांनी बोलून दाखवली. त्यामुळे अजित पवारांचे लक्ष आता प्रदेशाध्यक्षपदावर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.(Political News)
पक्ष संघटनेमध्ये काम करायची इच्छाही अजित पवारांनी बोलून दाखवली.
दरम्यान, अजित पवारांच्या या मागणीनंतर छगन भुजबळ यांनी आपलीही प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा असल्याचे बोलून दाखवले आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी चेहरा असावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. यासाठी छगन भुजबळ यांनी स्वत:सह आणखी तीन नेत्यांची नावं घेतली आहेत.(Political News)
ओबीसींना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली तर आपण ओबीसी समाज जोडू शकतो,(Political News) असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला. ओबीसीमध्ये सर्वप्रथम जितेंद्र आव्हाड, धंनजय मुंडे, सुनील तटकरे आणि शेवटी अनुभवी अध्यक्ष हवा असेल तर आपणही तयार असल्याचं छगन भुजबळ म्हणाले.
या वेळी काँग्रेस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्षही ओबीसी असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. तसंच जयंत पाटील पाच वर्षे एक महिना अध्यक्षपद सांभाळत आहेत, पण आपल्याला ४ महिनेच अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली होती, असंही भुजबळ म्हणाले आहेत.(Political News)
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष पदावरून भाजपने राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. ज्या घटना राष्ट्रवादीत घडतात त्या त्यांचा अंतर्गत प्रश्न आहेत. त्याच्यावर भाष्य करावं की नाही हा प्रश्न आहे. त्याचबरोबर वर्धापनदिनी शितयुद्ध सुरु झालंय, काही दिवसांनी राष्ट्रवादीत टोळी युद्ध दिसेल, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.(Political News)