अजित जगताप
Political News | सातारा : सध्या भारतीय जनता पार्टीने भिलार ता. महाबळेश्वर येथील अभ्यास वर्गात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचाच कार्यकर्ता ( Political News )असेल असा प्रचार सुरू केला आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा- जावली, माण- खटाव ,कोरेगाव या मतदारसंघात सेना भाजपचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते सत्ताधाऱ्यांच्या कार्यप्रणाली गतिमान करण्याच्या प्रतिक्षेत आहे. मात्र,भाजप पक्षांतर्गत घडामोडीवर स्पष्ट बोलणे टाळले आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचाच कार्यकर्ता…
याबाबत माहिती अशी की, व्यक्तीनिष्ठा जपून आपला नेता ज्या पक्षात तोच आपला पक्ष असे समजून सेना-भाजप पक्षामध्ये काहींनी प्रवेश केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाजप पक्ष हा महाराष्ट्रातील एक नंबरचा पक्ष अशी वल्गना सुरू झालेली आहे. मुळात सातारा जिल्ह्यात व्यक्ती पूजक कार्यकर्त्यांची संख्या वाढली असून निष्ठा, तत्त्व, वैचारिक भूमिका याच्याशी देणेघेणे राहिलेले नाही. ‘आमचा नेता, आमचा पक्ष’ असा नारा देऊन ‘सबका साथ, सबका विकास’ या ब्रीदवाक्याला श्रद्धांजली वाहिली आहे. असे सर्रास चित्र दिसत आहे. भाजप मधीलच आमदार-खासदारांचे मतभेदाची दळणे दररोज दळली जात आहेत.
भविष्यात अशा या विनानिष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे लवकरच सेना- भाजप उघडी पडेल. त्यावेळेला त्यांना निष्ठावंत कार्यकर्त्यांची गरज भासेल. अशी आता कार्यकर्ता भूमिका मांडू लागला आहे. त्याकडे दुर्लक्ष होऊ नये ही माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शिवसेना असो की, एकेकाळी भाजपचा ध्वज अथवा राष्ट्रीय स्वयं संघाचे नाव घेतली तरी आग पाखड करणाऱ्या काही राजकीय कुटुंबातील सदस्य आता शहा-मोदींचे कौतुक करण्यास धन्यता मानत आहे. या पाठीमागे कोणतीही राजकीय भूमिका नसून आपला किती स्वार्थ जास्त होतो? याकडेच बारकाईने लक्ष देऊन आहेत.
छोट्या- छोट्या जातींची महामंडळ करून छोट्या जातींना खुश करण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे त्या जातीतील काही सदस्य आता शहा-मोदींचे कौतुक करण्यास धन्यता मानत आहे. सेना- भाजपमध्ये आलेले सर्वच नेते हे प्रामाणिक किंवा अप्रामाणिक नाहीत तर त्यामधील काही नेत्यांवर इतर पक्षांमध्ये खरोखर अन्याय झालेला आहे. या अन्यायाची चीड म्हणून एक पर्याय म्हणून काहीनी सेना- भाजप पक्षात प्रवेशकर्ती बनले आहेत.
सेना- भाजप पक्षांनीही विकासाच्या दृष्टीने विकास कामे भरपूर केली आहेत. या गोष्टी सुध्दा नजरेआड करून चालणार नाहीत .छोट्या- छोट्या जातींची महामंडळ करून छोट्या जातींना खुश करण्याचा प्रयत्न होत आहे. या महामंडळाच्या माध्यमातून ५० ते १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. या महामंडळाची चालू अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर अनेकांनी सत्ताधाऱ्यांचे सत्कार व स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिलेले आहेत.
बऱ्याच लोकांना आता महामंडळावर वर्णी लागेल. अशी अशा पल्लवीत झाल्यामुळे सत्कार करणाऱ्यांची संख्या वाढू लागलेली आहे. हे त्रिवार सत्य आहे. टोपल्यात भाकरी चार आणि खाणारे नऊ असल्यानंतर पाच व्यक्ती नाराज होतात किंवा त्यांना अर्धपोटी राहावे लागते. असाच काहीसा प्रकार नवीन महामंडळाबाबत होऊ नये. याची सत्ताधाऱ्यांनी दक्षता घ्यावी. अशी मागणी पुढे आलेले आहे.
भारतीय जनता पक्ष हा खरं म्हणजे राष्ट्रीय स्वयं संघाच्या व जनता पार्टीच्या पायाभरणीतून उभा राहिलेला पक्ष आहे. संघाचे कार्यकर्ते अथवा भाजपचे कार्यकर्ते हे भाजप व्यतिरिक्त कुणालाही मत देणार नाही. कारण, त्यांची बांधिलकी ही भाजपसोबत आहे. अशीच एकेकाळी शिवसेनेची अवस्था होती. परंतु, अलीकडच्या काळात इतर पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांची सेटलमेंट अथवा तडजोड पाहिली तर निष्ठावंत सेना- भाजप कार्यकर्त्यांना आता या पक्षाचा एकतर्फी कारभारामुळे त्रास सहन करावा लागत आहे अशी चर्चा होताना दिसते. ही चर्चा दुर्लक्षित करण्यासारखी नाही. असे भाजपचे वरिष्ठ नेते मानत आहे.
राजकारण करत असताना काही उणिवा असल्या तरी सुद्धा कार्यकर्त्यांना सामावून घेण्यामध्ये राजकीय हित आहे. वैचारिक भूमिका सेना- भाजप कधीही बदलणार नाही. त्यामुळे सेना- भाजपच्या नाराज असणाऱ्या कार्यकर्त्यांची लवकरच समजूत काढण्यात यश मिळेल. असे काही पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याची अटीवर सांगितले.
शिवसेनेचे विभाजन झाले. त्यानंतर शिवसेनेचे मावळे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजप वरिष्ठ नेत्यांनी वर्णी लावून ठाकरे कुटुंबातील सदस्य यांच्या सह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगलेच डिवचले आहे. त्यातच शिवसेनेत मानापमान नाट्याने दुखावलेले व व्यवसायिक राजकर्त्यांनी शिवसेनेच्या एका गटात प्रवेश करण्याचा सपाटा लावला आहे. या प्रक्रियेत सेना- भाजप निष्ठावंत मंडळी नाराज झाली आहेत.
त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष लक्ष वेधले पाहिजे अन्यथा भाजप -सेनेला उमेदवार मिळतील पण, निष्ठावंत कार्यकर्ते मिळणार नाही. अशी ही भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, भाजप निष्ठावंत कार्यकर्ते मंदार जोशी,सहकार भारतीचे विनय भिसे यांच्या सह डझनभर जुन्या व निष्ठावंत भाजप कार्यकर्ते यांनी भाजपची सत्ता पूर्ण यावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे नमूद केले आहे. मात्र, अधिक भाष्य करणे टाळले आहे. शिवसेनेचे शिवसैनिक रमेश बोराटे, आतिष ननावरे, युवराज पाटील, महेश शिंदे, हर्षल कदम आदि मान्यवरांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Satara News : सातारा औद्योगिक न्यायालयाच्या मध्यस्थीने तूर्तास संप मागे : भगवानराव वैराट
महिला दिन विशेष : सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला जिल्हाध्यक्ष : श्रीमती देशमुख
पुणे-सातारा रोडवर हवेत गोळीबार करुन ४ लाखांची रोकड लुटली ; खेड शिवापूर परिसरातील घटना..!