Political News : छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. मागील वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करत सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीला पाठिंबा दिला. या दोन्ही पक्षातील बंडानंतर पक्षात उभी फूट पडली आहे.(Political News) आता काँग्रेस देखील फूटीच्या उंबरठ्यावर आहे. काँग्रेसचे काही आमदार बंडाच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे.
यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप येणार असल्याची चर्चा होत आहे.(Political News)
महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत.
संजय शिरसाट म्हणाले की, काँग्रेस फुटणार हे निश्चित आहे. काँग्रेसचे काही आमदार बंडाच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार हे नक्की!(Political News)
दरम्यान अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रिपद गेल्याने शिवसेनेची कोंडी होणार नसल्याचा दावा देखील शिंदे यांनी या वेळी केला आहे. शिरसाट हे मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर होते, मात्र त्यांना मंत्रिपद मिळालं नाही, यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला काही दिलं नाही तरी मुख्यमंत्री आमचे आहेत, यात समाधान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.(Political News)
पावसाळी अधिवेशनावर प्रतिक्रीया देताना शिरसाट म्हणाले की, हे असे पहिलेच अधिवेश आहे, ज्यामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी एकत्र आहेत. सभागृहात प्रश्न मांडले गेले पाहिजेत, सभागृहाचा त्याग करू नये असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.(Political News)