नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नुकतेच त्यांनी नाशिक येथील ऐतिहासीक काळाराम मंदिराचे दर्शन घेतले आहे. विशेष म्हणजे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. नुकतीच त्यांच्या रोड शोला सुरूवात झाली आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त, जोरदाप शक्तीप्रदर्शन यावेळी करण्यात येत आहे. संपूर्ण नाशिक नगरी ही सजवण्यात आली आहे. सध्या पंतप्रधानांचा रोड शो सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे देखील मोदींसोबत त्यांच्या गाडीत स्वार झालेले आहेत. पंतप्रधान मोदी हात उंचावून उपस्थितांना अभिवादन करताना दिसत आहे.
काळाराम मंदिराचे दर्शन
रोड शोनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक येथील ऐतिहासीक काळाराम मंदिराचे दर्शन घेतले आहे. काळाराम मंदिराच्या परिसरात आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी ढोलताशा आणि लेझीम पथकांचे प्रदर्शन करण्यात आले आहे. 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे रामकुंड येथे गोदा आरती करण्याचे देखील नियोजन आहे. नरेंद्र मोदी हे रामकुंड परिसरात येणार असल्याने रामकुंडाला फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.
आपले लाडके प्रधानसेवक @narendramodi जी प्रभू श्रीरामांच्या वास्तव्याने पावन झालेल्या नाशिकमध्ये येत आहेत. मोदीजी काळाराम मंदिरात महापूजा आणि गोदामाईची महाआरती करणार आहेत#NarendraModi #ModiInNashik #KalaRamMandir pic.twitter.com/QKuzS6f6VU
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 11, 2024
कडक सुरक्षा व्यवस्था
देशभरातून या महोत्सवासाठी तरुण तरुणांनी गर्दी केलेली आहे. 15 फुटांचा भव्य दिव्य असा व्यासपीठ उभारण्यात आलेला आहे. वीस हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था एका पॅंडॉलमध्ये करण्यात आलेली आहे. जवळपास डझनभर केंद्रीय मंत्री आणि राज्यातले मंत्री या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. फुलांची आरस संपूर्ण व्यासपीठाला करण्यात आलेली आहे. मोठे एलईडी स्क्रीन लावण्यात आलेले आहे.