Pimpri News : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यातील प्रस्तावित १५ एकर जागा राष्ट्रीय ललित कला अकादमीकडे हस्तांतरीत करावी आणि अकादमीच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.(Pimpri News)
अकादमीचे प्रादेशिक केंद्र पिंपरी-चिंचवडमध्ये स्थापन केले जाणार.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, राष्ट्रीय ललित कलांचे संगोपन, प्रसार आणि संशोधन करणा-या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ललित कला अकादमीचे प्रादेशिक केंद्र पिंपरी-चिंचवडमध्ये स्थापन केले जाणार आहे. केंद्र सरकारने यासाठी मान्यता मिळाली असून, ही आम्हा पिंपरी-चिंचवडकरांसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे.(Pimpri News)
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील भोसरी एमआयडीसी जे- ब्लॉक मोकळी जागा क्रमांक २९ येथील आरक्षण क्र. ४५ ही जागा बांधकामासह राष्ट्रीय ललित कला अकादमीस हस्तांतरित करण्यासाठी महापालिका प्रशासनाने एमआयडीच्या ताब्यात दिली आहे.(Pimpri News)
सदर जागेची मूळ मालकी एमआयडीसीची असल्यामुळे एमआयडीसीच्या सदस्य मंडळ बैठकीत मा. उद्योग मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ३९२ व्या बैठकीत ठराव क्र. ६३९७ अन्वये भूखंड बांधकामासह ललित कला अकादमीच्या प्रकल्पाकरिता करारनामा रुपये १/- दराने वाटप करण्यास मंजुरी दिली आहे.(Pimpri News)
राज्यातील कलावंताना प्रोत्साहन मिळावे, तसेच पारंपरिक कलांचे जतन व्हावे. या करिता राष्ट्रीय ललित कला केंद्र महाराष्ट्रात होण्यासाठी अनेक कलाकार प्रयत्नशील होते. त्यासाठी पिंपरी-चिंचवड येथील महापालिकेच्या आरक्षणाची जागा निश्चित केली आहे. सदर जागेचा ताबा ‘एमआयडीसी’कडे देण्यात आला. त्या जागेचा ताबा आता राष्ट्रीय कला अकादमीकडे देण्यात यावा, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.(Pimpri News)
शहराच्या लौकीकात भर पडणार…
प्रस्तावित, ललित कला अकादमीच्या केंद्रामुळे कलांच्या प्रदर्शनांसाठी कलादालन उपलब्ध होणार आहे. तसेच, संशोधनासाठी स्टुडिओ, लेझरसह नवतंत्रज्ञानावर आधारित कलांसाठी दालन, कलेचे शिक्षण घेणा-यांसाठी शिष्यवृत्ती आणि कार्यशाळांचे आयोजन, जेष्ठ कलाकारांच्या कलाकृतींचे संग्रहालय, कलाकारांसाठी निवासव्यवस्था आणि महाराष्ट्रातील कलांचा इतिहास सांगणारे प्रदर्शन व्यवस्था यामुळे उपलब्ध होणार आहे.(Pimpri News)
या केंद्रामुळे कलांचा विकास होण्याबरोबरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संधी निर्माण होता आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. तसेच, नामांकीत शिक्षण संस्थां आहेत. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रीय ललित कला अकादमीचे प्रादेशिक केंद्र झाल्यास खऱ्या अर्थाने शहराच्या लौकीकात भर पडणार आहे.