Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘पिंपरी-चिंचवडकरांची आता ‘ओला कचरा’ व ‘सुका कचऱ्याची’ चिंता मिटली : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रशासनाला सूचना…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 21 October 2022, 15:53

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील सोसायटींमध्ये निर्माण होणाऱ्या ओला कचरा विल्हेवाट लावण्याबाबत महापालिका प्रशासनाने बंधनकारक केले होते. मात्र, सोसायटीधारकांच्या भावनांचा विचार करुन ओला कचरा संकलित करण्याबाबत प्रशासनाची कार्यवाही ‘जैसे थे’ ठेवण्यात यावी. नवीन बांधकाम प्रकल्पांना ओला कचरा प्रक्रिया प्रकल्प बंधनकारक करण्यात यावेत. तसेच, ओला कचरा संकलन आणि विल्हेवाट याबाबत ठोस धोरण ठरवण्याबाबत समिती स्थापन करण्यात येईल, असा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालय येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी माजी खासदार अमर साबळे, भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार उमाताई खापरे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, महापालिका प्रशासक व आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, प्रदीप जांभळे-पाटील, उल्हास जगताप यांच्यासह प्रमुख अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे महानगर प्रदेश विकास महामंडळाच्या मुख्यालयांना भेट दिली. तसेच, कामकाजाचा आढावा घेतला.

 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, २०१७ मध्ये केंद्रीय पातळीवर निर्णय झाला असला, तरी त्याची अंमलबजावनी करण्यात आली नव्हती. मग, आणखी काही दिवस ओला कचरा उचलण्यात यावा. प्रतिदिन १०० किलोपेक्षा अधिक ओला कचरा निर्माण होणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील गृहनिर्माण सोसायट्यांना त्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प सोसायट्यांनीच उभारण्याचा आणि अशा सोसायट्यांचा ओला कचरा दि. १ नोव्हेंबरपासून न उचलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र, या निर्णयाला तूर्त स्थगित करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच, नागरिकांच्या भावना लक्षात घेता कोणतीही घाई न करता या निर्णयाची व्यवहार्यता तपासण्यासाठी नागरिक आणि अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक समिती स्थापन करण्याबाबत सूचना केल्या आहेत.

सोसायटी फेडरेशनच्या मागणीला अखेर यश…
चिखली –मोशी- चऱ्होली पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनने ओला कचरा न उचलण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी कचरा उचलला नाही, तर महापालिका आवारात कचरा फेकू… असा इशाराही दिला होता. त्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी मध्यस्थी करीत सोसायटीधारकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

त्यानंतर पालकमंत्र्यांच्या अधिकारात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन शहरवासीयांना मिळाले होते. अखेर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहराच्या भेटीवर असताना सोसायटीधारकांचा कचरा उचलण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवडमधील सोसायटी फेडरेशनने घेतलेल्या आक्रमक भूमिकेचा फायदा संपूर्ण राज्यातील महापालिका क्षेत्रातील सोसायटीधारकांना होणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19
Next Post

दिवाळीनंतर शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे 'उडणार फटाके' ....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.