पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फिट पडली तेव्हापासून शरद पायावर आणि अजित पवार हे कधी बॅनरवर एकत्र झळकले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामतीत आता पवार कुटुंबातच दोन गट पडले आहेत. मात्र, यंदाच्या पंढरीतील आषाढी वारी उत्सवातही राजकीय रंग पाहायला मिळत आहे.
बारामती ही राजकारणाची पंढरी असल्याचा दावा करत बारामतीमध्ये फलक झळकावले आहेत. ज्यावर ‘राजकारणाच्या पंढरीत वारकरी भक्तांचे स्वागत’ या मजकुरासोबत शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे, आणि सुनेत्रा पवार यांचे एकत्र फोटो सुद्धा आहेत. हे बॅनर सद्या व्हायरल होत आहे.
देशाच्या राजकारणात एकट्या बारामतीचे तीन खासदार आहेत, तर राज्याच्या विधानसभेत दोन आमदार हे बारामतीचेच आहेत. तसेच, राज्याचं राजकारण हे नेहमीच बारामतीच्या अवतीभोवती म्हणजे शरद पवारांच्या केंद्रस्थानी असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे, बारामतीच्या राजकीय घडामोडी देशात चर्चेत असतात. मात्र, वारीच्या पालखी सोहळ्यानिमित्त पवार कुटुंबांतील राजकीय नेत्यांचा एकत्रित बॅनर झळकला आहे.
पवार कुटुंब एकत्र
राजकारणाच्या दृष्टीने बारामती दोन गटात विभागली असली तरी बारामतीकरांसाठी मात्र सारे एकच असल्यासारखे आहेत. बारामतीमध्ये झळलेल्या बॅनरवरुन असाच काहीसा संदेश देण्यात आला आहे. राजकारण्यांच्या पंढरीत तुमचे स्वागत. असं आशय या फलकावर आहे. वारकऱ्यांचे स्वागत करताना या फलकावर सर्वच पवार कुटुंबाचे फोटो एकत्रितपणे झळकले आहेत. त्यामध्ये, शरद पवार, अजित पवार आणि रोहित पवार यांच्या फोटोची एक लाईन, तर सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्या फोटोची एक लाईन दिसून येत आहे. त्यासोबतच, सर्वात वरती बा विठ्ठलाचा फोटो दिसून येत आहे. 8 नं. बॉयज… ने हा बॅनर उभारला असून ना सन्मान का मोह, ना अपमान का भय.. असेही वाक्य बॅनरवर दिसून येत आहे.