सुरेश घाडगे : परंडा
Paranda News : परंडा, (उस्मानाबाद) : तालुक्यातील तांदुळवाडी ते देऊळगाव पुलावरील तात्पुरते खड्डे बुजवले व पुलाच्या कामास मंजूरी मिळताच पुलाचे काम करण्यात येईल असे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम उपविभाग अभियंता यांनी दिल्याने मनसेने रास्ता रोको आंदोलन मागे घेतले आहे.(Paranda News)
तालुक्यातील तांदुळवाडी ते देऊळगाव नादुरुस्त पुला चे काम करण्यात यावे. अन्यथा १ जून रोजी परंडा शहरातील डॉ .बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा ईशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख आबासाहेब ढवळे यांनी दिला होता. (Paranda News)
तसेच या पुलावर पडलेल्या खडड्यात मनसे झेंडा लावून गांधीगिरी आंदोलन करण्यात आले होते याची दखल घेवून परंडा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग अभियंता यांनी दखल घेत या पुलावरील खड्डे स्टील व काँक्रीट टाकून तात्पुरती दुरुस्ती केली आहे व रस्त्याच्या कामाची दुरुस्ती करण्यात आलेली आहे. (Paranda News)
दरम्यान, नविन नळ कांडी व पुलाचे काम मंजूर होताच काम हाती घेण्यात येईल, असे उपविभागीय अभियंता यांनी लेखी आश्वासन दिल्याने आज गुरुवार दि . १ जून चे रस्ता रोको आंदोलन मनसेने तुर्त मागे घेतले आहे. अशी माहिती मनसे तालुका उपाध्यक्ष रोहित टिकोरे व शहर अध्यक्ष नवनाथ कसबे यांनी दिली. (Paranda News)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Paranda News : परंडा शहरातील घनकचरा व्यवस्थापन करणा-या नागराळ इंडिया कंपनीचे कंत्राट रद्द