सुरेश घाडगे
परंडा- Paranda News : तांदुळवाडी ते देऊळगांव रस्त्यावरील पुलावरील बिळात झेंडा लावून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आनोखे आंदोलन करून संबंधीत विभागाचे याकडे लक्ष वेधले असून परंडा तहसिलदार , सार्वजनिक बांधकाम उपविभाग व पोलीस निरिक्षक यांना सोमवार (ता. १५) निवेदन दिले. (Paranda News)
पुलावरील बिळात झेंडा लावून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आनोखे आंदोलन
पुलाचे काम तात्काळ करण्यात यावे, अन्यथा १ जून रोजी परंडा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे. तालुक्यातील तांदुळवाडी ते देऊळगांव रस्तामध्ये दोन पुल येत असुन सद्या त्या दोन्ही पुलाची अवस्था अत्यंत खराब आहे. या अपघाती भेगा, भगदाड, बिळं पडलेल्या, जिर्ण झालेल्या पुलावरती रस्त्याचे थातुर मातुर काम सुरू आहे. त्यामुळे भविष्यात पुल खचुन अपघात होण्याची शक्यता आहे.
या रस्त्यावर दुर्घटना होऊ नये यासाठी पुलाचे काम चांगले करावे. रस्त्याचे काम करण्यापुर्वी पुलाचे काम करणे जरूरीचे आहे. नंतरच रस्त्याचे काम करावे.अन्याथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दि . १ जून रोजी परंडा शहरातील डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, या निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे ,शहराध्यक्ष नवनाथ कसाब , तालुका उपाध्यक्ष रोहित टिकोरे यांची स्वाक्षरी आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Paranda News : गड संवर्धन उपक्रमांतर्गत परंडा भुईकोट किल्ल्यावर स्वच्छता मोहिम सुरु
Paranda News : परंडा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे रविवारी उद्घाटन…!