सुरेश घाडगे
Paranda News : परंडा (जि .धाराशिव) : परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी महाविकास आघाडीचे जयकुमार जैन ( शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ) तर उपसभापती पदी संजय पवार ( राष्ट्रवादी काँगेस ) यांची बिनविरोध निवड झाली.
महाविकास आघाडीचे १८ पैकी १३ संचालक हजर तर महायुतीचे ५ गैरहजर
यावेळी महाविकास आघाडीचे – १३ संचालक उपस्थित होते. तर महायुतीचे ( शिवसेना , भाजपा , रिपाई . ) – ५ संचालक गैरहजर राहिले. सभापती पदासाठी जैन यांचा तर उपसभापती पदासाठी पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने शुक्रवार ( दि.२६ ) दुपारी १ वाजता त्यांची निवड पिठासीन अधिकारी कुमार बारकुल यांनी जाहिर केली. (Jain of Mahavikas Aghadi as Chairman of Paranda Bazar Committee and Pawar as Deputy Chairman)
सार्वजनिक आरोग्य कुटूंब कल्याण मंत्री पालकमंत्री प्रा. डॉ . तानाजी सावंत व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या महायुतीने माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व माजी आमदार राहूल मोटे यांच्या महाविकास आघाडीला मोठे आव्हान दिले होते. (Paranda News) झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी ने १३ तर महायुतीने ५ जागा मिळवल्या होत्या . महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होणार हे स्पष्ट झाले होते .असे असताना सावंत समर्थक सुरेश उर्फ सुर्यकांत कांबळे यांनी ८ संचालकांचे अपहरण ऐन निवडीच्या दिवशी बुधवार ( दि.२४ ) केले होते . एकही संचालक उपस्थित नसल्याने विशेष सभा तहकूब करून पिठासीन अधिकारी कुमार बारकुल यांनी ही निवड शुक्रवार (दि. २६ ) ठेवली . तर अपहरण घटनेच्या त्याच दिवशी कांबळे यांनी मिरजे जवळ या संचालकांना सोडून दिले .
सायंकाळी या संचालकांना मोटे – पाटील यांनी टेंभूर्णी येथे आणले व कांबळे यांच्यासह ३५ जणांच्या विरुद्ध फिर्याद दिली . या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुरुवार (दि . २५ ) कांबळे यांच्यासह ५ जणांना अटक केली व माढा न्यायालयाने त्यांना ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली, (Paranda News) या नाट्यमय फिल्मी स्टाईल राजकीय घडामोडी नंतरही अखेर महाविकास आघाडीचेच सभापती – उपसभापती झाले .
या विशेष सभेला संचालक दादा घोगरे , डॉ . रविंद्र जगताप ,शंकर जाधव , जयकुमार जैन , हरी नलवडे , संजय पवार, सोमनाथ सिरसट , रतनबाई देशमुख , सविता मिस्कीन , सुरेश शिंदे , अॅड. सुजित देवकते , अनिकेत काशीद व जावेद बागवान हे महाविकास आघाडीचे १३ संचालक उपस्थित होते. (Paranda News) तर महायुतीचे संचालक राहूल डोके , अरविंद रगडे , विजयकुमार बनसोडे , महादेव बारसकर व परमेश्वर मिठाळे हे ५ गैरहजर राहिले .
यावेळी तणावपुर्ण शांतता असली तरी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी , कार्यकर्ते व समर्थकांनी मोठी गर्दी केली होती . निवड जाहिर होताच फटाके फोडून व गुलाल उधळून जल्लोष केला. (Paranda News) बाजार समिती ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी मिरवणुक काढण्यात आली .सभापती जैन व उपसभापती पवार यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Paranda News : परंडा शहरातील घनकचरा व्यवस्थापन करणा-या नागराळ इंडिया कंपनीचे कंत्राट रद्द