सुरेश घाडगे
Paranda News : परंडा : परंडा – धाराशिव बस अपघातात जखमी झालेल्या ४३ प्रवास्यांना पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी परंडा उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी (ता.४) संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास भेट देऊन तब्बेतीविषयी चौकशी केली आहे. (Guardian Minister Dr. Sawant visit)
योग्य उपचार करण्याच्या सूचना
(Paranda News) डॉक्टरांना योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या अपघातात जखमी झालेल्या प्रवास्यांची नावे पुढीलप्रमाणे
बस वाहन चालक सतीश पसारे, वाहक संतोष व्हटकर तसेच प्रवाशी चंद्रभागा वेताळ , दत्ता वेताळ, समिना पठाण, मंगल बोराडे, कल्याण बोराडे, आशपाक काझी, नुसरत काझी, रमेश आपर, संजय गुडे, जयसिंग नरसाळे, मुस्तफा शेख, श्रीमंत मुळीक, सहीर सय्यद, तमन्ना पठाण,रुकसाना नायर, आदित्य सोनवणे,मुकुंद करपे, बाळासाहेब कानगुडे, सोमनाथ गायकवाड, अनिता मुळीक, शिवकन्या दुधकवड, दौलत नरवड, मारुती जाधव, लता गुडे अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. (Paranda News)
मिळालेल्या माहितीनुसार, परंडा आगाराची परंडा – बार्शी – धाराशिव ( एमएच २० बी .एल. २१९२ ) हि बस शनिवार (ता. ३) सकाळी ७ : ३० वाजता परंडा बसस्थानकातून सुटली होती. (Paranda News) परंडा शहरापासून ४ कि.मी. अंतरावर परंडा – बार्शी रोडवरील सोनगिरी उल्फा पुलाजवळील वळणार सकाळी ७ : ४० वा . सुमारास बस पलटी झाली व अपघात झाला.
या बसमध्ये प्रवास करीत असलेले ४३ प्रवाशी जखमी झाले आहेत . समोरुन एक कंटनेर येत असताना समोरूनच एक कारगाडी त्या कंटनेरला ओव्हरटेक करीत बसच्या अंगावर समोर आली असता बस चालकाने धडक टाळण्यासाठी तथा बचाव करण्यासाठी बस रस्त्याच्या कडेला घेतली. (Paranda News) त्यावेळी बस घसरून रस्त्याच्या बाजूला कोसळली. चालकाच्या प्रसंगावधानाने व बसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.
प्रवाशांना बाहेर काढण्यास सोनगिरी व खासगाव येथील ग्रामस्थ तसेच वाटसरुंनी मदत कार्य केले तसेच आगारातील अधिकारी , पोलीस व आरोग्य कर्मचारी व व्हॅन घटना स्थळी दाखल झाले. (Paranda News) जखमींवर परंडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी परंडा पोलीसांनी पंचनामा करून या अपघात घटनेची नोंद केली आहे.
दरम्यान, युवा नेते रणजित पाटील , माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर व शिवसेना ( ठाकरे गट) तालुका प्रमुख मेघराज पाटील यांनी अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची विचारपूस केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Paranda News : परंड्याजवळ एसटी बसला अपघात २० प्रवासी जखमी ; मदतकार्य सुरु..!