Pankaja Munde : बीड : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे नेहमीच अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. सध्या पंकजाताईंनी बीडमध्ये एक व्यापक मोहीम हाती घेतली आहे. त्या बीडमधील सामान्य माणसांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधताना दिसत आहेत. भाजीविक्रेता, फूल विक्रेता, शेतकरी, लाँड्रीवाला अशा प्रत्येकाशी त्या आपुलकीने संवाद साधताना दिसत आहेत. यानिमित्ताने त्या पक्षात पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे दिसत आहे. अचानक हाती घेतलेली ही मोहीम राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.(Pankaja Munde)
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे नेहमीच अनेक कारणांमुळे चर्चेत असतात.
पंकजाताईंच्या नव्या मोहीमेविषयी जाणून घेतले असता, त्या सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याची माहिती मिळाली. ‘संपर्क से समर्थन’ या अभियानात त्यांनी भाग घेतला आहे.((Pankaja Munde)) या मोहिमेनिमित्ताने त्यांनी परळीतील ग्रामस्थ, छोटे व्यापारी आणि दुकानदारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी मुंडे यांच्या मोहिमेला पाठिंबा देत आपल्या व्यथा आणि समस्याही बोलून दाखवल्या.
दरम्यान, पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर ३ जून रोजी गोपीनाथ गडावर केलेल्या भाषणात त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली. पंकजाताई म्हणाल्या की, गेल्या ४ वर्षांत अनेक खासदार आणि आमदार झाले. मी या पदासाठी पात्र नसेन तर चर्चा होणारच, अशी खदखद त्यांनी बोलून दाखवली होती. याबाबत छेडले असता, मला जेव्हा बोलायचं तेव्हा मी बोलेन, असं सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांनी जोर धरला आहे. पंकजा मुंडे काय आणि केव्हा बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.((Pankaja Munde))
संपर्क से समर्थन ही मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राज्यात २० ते ३० जूनपर्यंत राबवली जाणार आहे. परळीत पंकजा मुंडे यांनी या मोहिमेला सुरुवात केली. सामान्य नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. मोदी सरकारने गेल्या ९ वर्षांत राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती असणारे पत्रक देण्यात आले. ९०९०९०२०२४ या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल करून पंतप्रधान मोदींना समर्थन देण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. पंकजा मुंडे यांच्या या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.(Pankaja Munde)
दरम्यान, बीड जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रामस्थांनी पंकजा यांच्या आवाहनानुसार मिस्ड कॉल देत पंतप्रधानांना समर्थन दिले. या मोहिमेत शहर आणि तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.((Pankaja Munde)