पुणे : शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापनेत माझा खारीचा काय माझा मुंगीचा देखील वाटा नाही. या प्रक्रियेमध्ये मी पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे मत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे.
महिन्याने मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, या मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने काही नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण दिसत आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील मंत्रिपदाची संधी न दिल्याने त्यांचे समर्थक नाराज आहेत. यापूर्वीही विधानपरषदेच्या निवडणुकांपूर्वी त्यांच्या समर्थकांनी आपली नाराजी उघडपणे दर्शवली होती. आता, स्वत: पंकजा मुंडेनी पात्रेतेबद्दल विधान करत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे. परळी मध्ये आयोजित तिरंगा रॅली कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या.
माझी पात्रता नसल्याने मंत्रीमंडळात स्थान मिळालं नसेल, असं सूचक वक्तव्यहि त्यांनी केले होते. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडेंबद्दल विधान करताना, त्या सर्वच पदांसाठी पात्र असल्याचं म्हटलं होतं. शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे नाराज असलेला सुर निघत असताना आज पंकजा मुंडे यांनी वेगळाच खुलासा केला आहे.
दरम्यान, सरकार स्थापन झालं याचा आनंद आहे. मात्र मी या प्रक्रियेमध्ये कुठेच नव्हते. त्यामुळे खोट श्रेय मी घेणार नाही. असे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. जे वंचित त्या सर्वांसाठी मी लढणार आहे. मंत्री मंडळात महिलांना स्थान देतील अशी अपेक्षा आहे या संदर्भात माझी सक्त मागणी आहे.