लहू चव्हाण
Panchgani News पाचगणी, (सातारा) : पाचगणी नगरपंचायत हद्दीतील सिद्धार्थनगर परिसरात अनेक दिवसांपासून विविध समस्या व अडचणींचा नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी खासदार श्रीनिवास पाटील व आमदार मकरंद पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनानुसार…!
सिद्धार्थनगर ही वस्ती येथील स्थानिक रहिवाशांनी महिलांनी हॉटेल शाळा या ठिकाणी धुनी भांडी करून कष्ट करून ही वस्ती स्थापन केली आहे. तरी त्या वस्तीत रहिवासी बंधू-भगिनींना सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. सिद्धार्थनगरचा झोन बदली करून सिटीसर्वे मध्ये दुसरे गावठाण घोषित करून यांनी N.A. (नॉन एग्रीकल्चर झोन) करावा.
रहिवाशांना बँक लोन करून स्वतःची घरे व्यवस्थित बाधता येतील तसा आदेश मुंबई हायकोर्टाने No. 27540F. 1997 रोजी दिला आहे. तसेच येथील बौद्धविहार मागील जागा मालकास विनंती करुन बौद्धविहार पाडून २५ फूट मागे घेऊन त्या ठिकाणी स्थानिक लोकांकरिता सभागृह तथा मंगल कार्यालय उभारता येईल व इथल्या स्थानिक लोकांची लग्नविधी सोहळे संपन्न होतील.
नव्याने उभारण्यात आलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे भविष्यात आपल्या खासदार व आमदार फंडातून कायमस्वरूपी जागा खरेदी करून कायमस्वरूपी दवाखाना निर्माण करावा. येथील लोकांचा एन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवतो त्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून स्थानिक लोकांच्या सार्वजनिक जागेत विहीर खोदली आहे. त्या विहिरीचे पाणी पंपाद्वारे उंचावर पाण्याची टाकी बनवून त्या टाकीतून ठिकठिकाणी स्टॅण्ड पोस्ट बांधून ते पाणी लोकांपर्यंत पोहोचवावे असा नगरपालिकेला ठराव करण्यास सांगावे. असे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी सिध्दार्थ सेवा संघाचे अध्यक्ष- रंजन कांबळे, उपाध्यक्ष अरुण कांबळे, सतिश सपकाळ, अशोक चव्हाण, गौरव कदम, अशू गायकवाड, सिध्दांत कांबळे, आशिष सपकाळ,गौतम कांबळे सचिन कांबळे आदी उपस्थित होते.