सागर जगदाळे
भिगवण : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व पद्मविभूषण शरद पवार यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त भिगवण सायकल क्लबच्या वतीने भिगवण ते केडगाव व केडगाव ते भिगवण अशा ८३ की.मी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे सर्व नियोजन सायकल क्लबचे अध्यक्ष केशव भापकर व नॅशनल उद्योग समूहाचे अल्ताफ शेख यांनी केले होते. या सायकल स्वरांना आयर्न मॅन राजेंद्र ठवरे यांच्याकडून पदक देण्यात आले.
शरद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील सायकल क्लबच्या वतीने ८३ किलोमीटर सायकलिंग करून अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या. निसर्ग संवर्धना बरोबरच आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गाच्या नयनरम्य वातावरणामध्ये भिगवणवरून केडगाव चौफुला व तेथून परत भिगवण या ठिकाणी ही रॅली आयोजित आली. या रॅलीचे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष सचिन बोगावत, रियाज शेख व रणजीत भोंगळे यांनी भिगवण या ठिकाणी स्वागत केले.
दरम्यान, भिगवण सायकल क्लब मधील महिलांनी देखील भिगवण ते डाळज व डाळज ते भिगवण असा वीस किलोमीटर सायकलिंग करून शरदचंद्रजी पवार यांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये नाझिया शेख, दिपाली भोंगळे, समृद्धी भापकर, डॉ.भरणे मॅडम, भक्ती दोभाडा, रेखा खाडे, अनिता ढोले आदींनी सहभाग घेतला
या रॅलीमध्ये डॉ, निंबाळकर, डॉ. संकेत मोरे, के.डी भांडवलकर, केशव भापकर, अल्ताफ शेख, रोहित दोशी, योगेश चव्हाण, संतोष दाताळ, संजय खाडे, नुरमहंमद शेख, संजय चौधरी,अनिल काळे, साहिल मुलानी आदींनी सहभाग घेतला.