BJP News : पुणे : भारतीय जनता पार्टी व स्मितसेवा फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्प (उन्हाळी शिबीर) चे आयोजन हडपसर गाव येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हॉल येथे दिनांक १५ ते ३० मे दरम्यान भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर उपाध्यक्षा स्मिता तुषार गायकवाड यांच्यामार्फत करण्यात आले आहे. (BJP News)
उन्हाळी शिबिराचे उद्घाटन एन.एस. इंटरस्कूल चे मुख्याध्यापक बाळकृष्ण गोसावी यांचे शुभहस्ते संपन्न झाले. या प्रसंगी शेप फॉउंडेशन चे मार्केटिंग हेड अनिल टेकाळे, प्रशिक्षक गिरीश बागलकोटकर, अनधा टेकाले, राहुल भुजबळ, अंकुर उमडेकर, अलका शिंदे, आशा भूमकर, विशाखा सुतार,मनीषा यादव, अनिता धाबेवार, वैशाली जाधव उपस्थित होते.
या उन्हाळी शिबिरा मध्ये मनोरंजन, नृत्य कला, लेझिम, संस्कृत संभाषण, पोहणे, कराटे, योगासने, ध्यानधारणा व अध्यात्मिक संस्कार अशा विविध बाबींचे प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. वय वर्ष ६ ते १८ पर्यंतच्या सर्व मुला-मुलींसाठी मोफत प्रवेश आहे.
या उद्घाटन प्रसंगी उन्हाळी शिबिराचे आयोजक भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उपाध्यक्षा स्मिता गायकवाड यांनी मुलांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शिबिरार्थी मुलांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या “आजच्या स्पर्धात्मक जगात विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे व चांगले गुण मिळवण्याचे प्रचंड मानसिक दडपण असते.
वर्षभर शाळा – महाविद्यालय, शिकवणी क्लासेस, गृहपाठ यात कोवळ्या वयातील विद्यार्थी शारीरिक व मानसिक पातळीवर पूर्णतः थकून जातो. मग कधी एकदा परीक्षा संपतात आणि सुट्ट्या लागतात अशी अधीरता मनात निर्माण होते. पण मग सुरुवातीचे ४-८ दिवस निवांत गेल्यावर ह्या दिर्घ सुट्ट्या नाकोश्या वाटू लागतात. म्हणूनच सुट्ट्या मधील निवांतपणा, स्वच्छंदीपणा, मुक्त खेळणे – बागडणे, मनोरंजन याच बरोबर नवीन काही तरी शिकायला मिळायला हवे याच तळमळीने उद्याची संस्कारित युवा पिढी घडविण्यासाठी या ऊन्हाळी शिबिराचे आयोजन आम्ही केले आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांनो आपण याचा मनसोक्त आनंद घ्या व तुमची सुट्टी सत्कारणी लावा. ” शिबिराचे व्यवस्थापन स्मित सेवा फाउंडेशन च्या स्वयंसेवकांनी केले आहे.