राहुलकुमार अवचट
यवत : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अजित पवार यांचा निषेध करत कारवाई करण्याची मागणी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या नेतृत्वाखाली दौंड येथे करण्यात आली.
विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत, नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा भाजपाच्या वतीने राज्यभर विरोध होत असताना दौंड येथील छत्रपती शिवाजी चौक येथे निदर्शने व घोषणाबाजी करण्यात आली.
विरोधी पक्षनेते यांच्या वक्तव्यांने महाराष्ट्रसह संपूर्ण देशवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्या असुन सतत वादग्रस्त व बेताल वक्तव्य करुन सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम जाणीवपूर्वक करत असल्याने राज्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व हिंदू धर्म विरोधी वक्तव्य करणारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली.
यावेळी भाजप पश्चिम महाराष्ट्र समन्वयक गणेश आखाडे, माऊली शेळके, अमर जोगदंड, अविनाश गाढे, वैभव आटोळे, दौंड आसिफ खान, तुकाराम अवचर, योगेश डाबी, रवी बंड, विकास काळे, राजेंद्र काटकर, भाऊसाहेब साळुंखे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.