सातारा : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि आमची युती असणार आहे, ती राज्यात सगळीकडेच असणार आहे. मात्र, राष्ट्रवादी पक्ष एक नंबर की आम्ही हे जनता ठरवत असते, असे एकनाथ शिंदे आज सातारा येथे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर होते. त्यांनी यावेळी साताऱ्यातील कॉरिडॉरमध्येच ५०० एकरवर अँग्रो इंडस्ट्रियल पार्क उभे केले जाणार असून याचा फायदा स्थानिक लोकांनाच होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
राजकीय टिपणी करताना शिंदे म्हणाले, आमच्या पक्षात इनकमिंग जोरदार सुरु असल्याने पक्षाचा विस्तार होत आहे. कोरोनामध्ये मृत्यू झालेल्या लोकांच्या वारसदारांना कर्जमाफी करण्याचा निर्णय आम्ही आधीच घेतला असून त्यापासून कुणालाही वंचित ठेवणार नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.
आमच्या मनगटावर आमचा विश्वास आहे कोणाला हात दाखवण्याची गरज नाही, आम्ही लपून छपून दर्शनाला जात नाही. अघोरी प्रथेवर विश्वास ठेवणाऱ्यांचा शेवटसुद्धा अघोरीच होतो, संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचा समाचार मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला.