मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्याविरोधात शिवडी न्यायालयाने अजमीनपात्र वॉरंट जारी केले आहे. यामुळे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत अजून वाढ झाली आहे.
खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी मानहानीच्या खटला दाखल केला होता. या खटल्यास राऊत हे वारंवार गैरहजर राहत होते. त्यामुळे न्यायालयाने हे वॉरंट बजावले आहे. आता या खटल्याची पुढील सुनावणी २४ जानेवारी रोजी होणार आहे.
शिवडी महानगर दंडाधिकाऱ्यांकडे मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीत, राऊत यांनी केलेले आरोप निराधार आणि पूर्णपणे बदनामीकारक असल्याचे म्हटले होते. तसेच राऊत यांना नोटीस बजावून मानहानीच्या आरोपाखाली फौजदारी कारवाई सुरू करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याच्या आरोप राऊत यांनी सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्यात आला होता.