नागपूर : भाजपकडून पुन्हा ठाकरे गटावर निशाणा साधम्यात आला आहे. मात्र, आता ठाकरे आमदार गटाचे सुधाकर बडगुजर हे भाजपच्या निशाणावर आहेत. विधानसभेच कामकाज सुरू असताना नितेश राणेंनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुर्ला याच्यासोबत सुधाकर बडगुजर यांच्या पार्टीचे फोटो दाखवले. त्यामुळे सुधाकर बडगुजर यांचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंध असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आहे. सलीम कुत्ता हा मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातला प्रमुख आरोपी आहे, तो पॅरोलवर असताना बडगुजर यांनी ही पार्टी केली असा आरोप नितेश राणेंनी केलाय.
यावर एसआयटी चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. तर, आशिष शेलार यांनी मविआचं सरकार आल्यानं पेग, पेंग्विन आणि पार्टीला सुरुवात झाली, असे म्हटले. नितेश राणे म्हणाले, दाऊदच्या जवळचा मुख्य आरोपी 93 च्या ब्लास्टचा आरोपी हा जन्मठेप भोगतोय. पॅरोलच्या शेवटच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नाशिक अध्यक्षासोबत पार्टी करतो. सुधाकर बडगुजर यांचा पार्टी करत असातनाचा फोटो आणि व्हिडीओ आहेत.1993 चा बॉम्ब ब्लास्ट हा देशाला हादरवणारा होता. यातील यारोपी सलिम कुर्ला हा पेरोलवर असताना तो पार्टी करतो. उद्धव ठाकरे गटाचा नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सोबत पार्टी करतो, हे गंभीर आहे. याला कोणाचा पाठींबा आहे.
सभागृहात कोण काय म्हणाले?
बडगुजर हा छोटा मासा आहे . देशाचा नंबर एक शत्रु दाऊद आहे. त्याला रसद पुरवणारा कोण आहे? बडगुजर याचा तपास केला पाहिजे. पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे, असे दादा भुसे म्हणाले. तर अशिष शेलार म्हणाले, मविआ सरकार आल्यानंतर पेग, पेंग्विन आणि पार्टीची सुरुवात झाली गंभीर बाब आहे. राजकिय वरदहस्त असल्याची बाब आहे. कुर्लाला बिल्लीच समर्थन आहे. अजय चौधरी तुम्ही यावर कारवाई करण्याच्या संदर्भात मागणी केली पाहिजे.