लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील निलेश अशोक काळभोर यांची शिवसेना शिंदे गटाच्या ‘जिल्हासंघटकपदी’ (कार्यक्षेत्र- हवेली विधानसभा) नुकतीच निवड करण्यात आली आहे.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते नुकतेच त्यांच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार हि नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी माजी आमदार शरद सोनवणे, शिंदेगटाचे तालुकाप्रमुख विपुल शितोळे, उल्हास तुपे, माजी पंचायत समिती सदस्य भरत मिसाळ, गजानन काळभोर, गोरख लोणकर, मयूर काळभोर, राजेंद्र काळभोर, नरेंद्र वलटे, आदी शिवसैनिक उपस्थित होते.
हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करणार असून, शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना बरोबर घेऊन कार्य करणार असल्याचे नियुक्तीनंतर काळभोर यांनी सांगितले.