Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षणाचा नवा पॅटर्न; जुनी पद्धत रद्द, इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 24 August 2025, 9:00

पुणे: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आरक्षण निश्चित करण्यासाठी आता नवीन नियमावली लागू झाली आहे. यामुळे, ज्या उमेदवारांनी मागील निवडणुकीतील आरक्षणाचा विचार करून तयारी सुरू केली आहे, त्यांची निराशा होऊ शकते. यापुढे  अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) मध्ये ज्यांची सर्वाधिक लोकसंख्या असेल अशा जागांपासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने जागा आरक्षित केल्या जातील, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) संतोषकुमार देशमुख यांनी दिली.

उपजिल्हाधिकारी (महसूल) संतोषकुमार देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी गट आणि गणांच्या आरक्षणाची प्रक्रिया नव्या नियमांनुसार केली जाणार आहे. त्यासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. अद्याप आरक्षण सोडतीबाबत कोणतीही अधिकृत सूचना प्राप्त झालेली नाही; मात्र, त्या सूचना आल्यानंतर या नव्या नियमांनुसार ही प्रक्रिया राबवली जाईल.

हा नवा उतरता क्रम 2025 नंतर होणाऱ्या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी लागू होईल. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांच्यासाठी राखीव जागा निश्चित झाल्यानंतर, ज्या जागा पूर्वी ओबीसीसाठी (OBC) राखीव नव्हत्या, त्या जागांवर फिरत्या पद्धतीने ओबीसी आरक्षण दिले जाईल.

यापूर्वी 1996 च्या नियमावलीनुसार 1997 ते 2017 पर्यंत निवडणुकांचे आरक्षण निश्चित केले जात होते, पण आता तो नियम रद्द करण्यात आला आहे. आता 2011 च्या जनगणनेनुसार ज्या गट/गणात अनुसूचित जाती आणि जमातीची लोकसंख्या सर्वाधिक असेल, त्या जागांना प्राधान्य दिले जाईल आणि नंतर उतरत्या क्रमाने या जागा वाटून दिल्या जाणार आहेत.

 

सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 68 गट आणि 11 पंचायत समित्यांच्या 136 गणांसाठी ही नवी नियमावली लागू होईल. दरम्यान, ही नवी नियमावली 2025 नंतर होणाऱ्या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे, असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, अनुसूचित जाती, जमाती तसेच नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आणि त्यातील महिलांसाठी किती जागा राखीव ठेवाव्यात, याचा अंतिम निर्णय राज्य निवडणूक आयोग घेणार आहे.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘मास्तर, हे वागणे बरे नव्हे!’ शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत लक्ष्मीदर्शनाची जोरदार चर्चा

Thursday, 22 October 2026, 22:49

सामाईक जमिनीच्या विक्रीसाठी सहहिस्सेदारांची संमती बंधनकारक; महसूल विभागाचे दुय्यम निबंधकांना आदेश

Thursday, 22 October 2026, 22:36

भोरमधील धक्कादायक प्रकार! चुलत भावांनीच तोडले शरीराचे लचके; अल्पवयीन मुलीला माळरानावर नेत अत्याचार, मुलगी गर्भवती राहताच…

Thursday, 22 October 2026, 22:31

पुण्याच्या हडपसरमध्ये साकारणार अत्याधुनिक हेलिपोर्ट! २५० एकरातील ऐतिहासिक ग्लायडिंग सेंटरला मिळणार एकदम नवीन रूप

Thursday, 22 October 2026, 20:33

बाणेरमधील कोट्यवधींच्या जमिनीवरून वाद; बनावट करारनामा आणि कुलमुखत्यारपत्र प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

Thursday, 22 October 2026, 20:30

लाडक्या बहिणींकडून होणार पैशांची वसुली? ‘या’ महिलांना पैसे परत करावे लागणार; सरकारकडून यादी तयार, वाचा सविस्तर…

Thursday, 22 October 2026, 18:41
Next Post

अपघात की २० लाखांच्या कर्जामुळे मृत्यूचा बनाव? बेपत्ता गौतम गायकवाड प्रकरणात नवा ट्विस्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp