पुणे : राज्यातील ६ जिल्ह्यांतील ५४७ ग्रामपंचायतीचे निकाल सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणी जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादीने आपला गुलाल उधळला आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीने तब्बल २९ जागांवर विजय मिळवला आहे. तर राज्यात २७४ ग्रामपंचायतींवर कमळ फुलले आहे. असा दावा भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणुका पार पडत असून १६ जिल्ह्यांतील ५४७ ग्रामपंचायतीचे निकाल आज लागणार आहेत. एकूण ६०८ ग्रामपंचायतीपैकी ६१ ग्रामपंचायतींवर सरपंचाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. काल पार पडलेल्या मतदानासाठी ६७ टक्के मतदारांना मतदानाचा हक्क पार पाडला आहे. तर आज मतमोजणी पार पडत आहे. व निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येत आहे. शिंदे फडणवीस सरकारने या निवडणुकीत जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, आत्तापर्यंत २६२ ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. यात भाजप १०१, शिंदे गट २४, शिवसेना १४, कॉंग्रेस २२, राष्ट्रवादी ५८ आणि अपक्षासहित अन्य पक्षाचे ४३ उमेदवार विजयी झाले आहेत. आंबेगाव तालुक्यात १८ पैकी १४ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे.
भाजपचे नेते केशव उपाध्ये म्हणाले कि, राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत जनतेने भाजपला कौल दिला आहे. निवडणूक कोणतीही असे जनता भाजपच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. भाजपला ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये २७४ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. असे उपाध्ये यांनी केला आहे. तर १२८ ग्रामपंचायतींवर विजय मिळवल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे.